...म्हणून विकी-कतरिनाने लग्नसोहळ्यात मोजक्याच बॉलिवूड स्टार्सना केलं होतं निमंत्रित | vicky kaushal and katrina kaif did not invite many bollywood stars for their wedding and this is the reason | Loksatta

…म्हणून विकी-कतरिनाने लग्नसोहळ्यात मोजक्याच बॉलिवूड स्टार्सना केलं होतं निमंत्रित

त्यांनी ९ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली.

…म्हणून विकी-कतरिनाने लग्नसोहळ्यात मोजक्याच बॉलिवूड स्टार्सना केलं होतं निमंत्रित

Vicky kausha-Katrina Kaif anniversary: विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाचा आज पहिला वाढदिवस. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट येथे या विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या लग्नसोहळ्याला मोजकेच पाहुणे उपस्थित होते. त्यांनी लग्नानंतर रिसेप्शनही केलं नव्हतं. इतर सेलिब्रिटींप्रमाणे ‘बिग-फॅट वेडिंग’ न करता विकी आणि कतरिनाने कुटुंबीय आणि मोजक्या जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थित लग्न केलं. त्यांनी हा निर्णय का घेतला असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण कतरिनानेच एका मुलाखतीत यामागचं कारण उघड केलं होतं.

कतरिनाने मध्यंतरी ‘झूम’ला एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत तिने सांगितलं, “आम्ही आमचा लग्नसोहळा अगदी खासगीत पार पाडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी करोनाचं संकट पूर्णपणे गेलेलं नव्हतं. आम्ही कोरोनाच्या नियमांमुळे अधिक सावध होतो. माझ्या कुटुंबातील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती आणि अशा गोष्टीला तुम्हाला गांभीर्यानेच घ्यावं लागतं.”

आणखी वाचा : “माझ्या काही रिलेशनशिप्स…” दिव्या अग्रवालचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

पुढे ती म्हणाली, “२०२० पेक्षा २०२१ हे वर्ष बरं होतं. पण आम्हाला लग्नसोहळ्यात प्रत्येक गोष्टीची बारकाईने काळजी घ्यावी लागली. म्हणून आम्ही मोजक्याच लोकांच्या सानिध्यात लग्न केलं. राजस्थानमध्ये लग्न खूप छान पद्धतीने पार पडलं आणि आम्ही दोघं खूप खूश आहोत.

हेही वाचा : अखेर प्रतीक्षा संपली! विकी कौशलचा बहुचर्चित ‘सॅम बहादुर’ हा चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अत्यंत गुप्त पद्धतीने, कोणतीही गोष्ट जाहीर न करता, अगदी कडक नियम पाळून हा विवाहसोहळा पार पडला. पंजाबी पद्धतीने हा विवाह पार पडला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 14:03 IST
Next Story
“तो मर्द आहे…” अर्जुन कपूरवरुन ट्रोल करणाऱ्यांना मलायका अरोराने सुनावलं