विकी कौशल आणि सारा अली खान यांचा ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपट शुक्रवारी २ जून रोजी प्रदर्शित झाला. विकी-सारा गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाचे जोरदार प्रदर्शन करत होते. दोघांचेही चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, आता चित्रपटाचे दुसऱ्या दिवशीचे कलेक्शन समोर आले आहे. हेही वाचा : छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर; बॉलीवूडचा ‘हा’ अभिनेता साकारणार शंभूराजांची भूमिका 'जरा हटके जरा बचके'ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ५.४९ कोटींची कमाई केली. चित्रपटाचे एकूण बजेट ४० कोटी रुपये आहे. अनेक ठिकाणी तिकिटाचे दर कमी ठेवण्यात आल्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करण्यास मदत झाली. विश्लेषक तरण आदर्श यांच्या ट्वीटनुसार दुसऱ्या दिवशी चित्रपटाने जवळपास ७.२० कोटींचा गल्ला जमवला असून चित्रपटाची एकूण कमाई १२.६९ कोटींपर्यंत पोहोचली आहे. हेही वाचा : “गरोदर राहिल्यावर…” जेनिफरनंतर प्रिया अहुजाचे निर्माते असित मोदींवर गंभीर आरोप, म्हणाली “तेव्हा मी खूप रडले…” 'जरा हटके जरा बचके'मध्ये विकी कौशल आणि सारा अली खानबरोबर इनामुलहक, नीरज सूद, राकेश बेदी, शारीब हाश्मी, सुष्मिता मुखर्जी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा इंदूरमधील मध्यमवर्गीय जोडप्यावर आधारित असून याचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. https://www.instagram.com/p/CtCFZeDIycu/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA== 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक'नंतर विकी कौशलचा हा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट आहे. प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद बघता वीकेंडला कमाईत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच बॉक्स ऑफिसवर अशीच कामगिरी सुरु राहिल्यास लवकरच चित्रपट २२ ते २३ कोटींचा गल्ला जमवू शकतो असा व्यापार विश्लेषकांचा अंदाज आहे.