काही महिन्यांपूर्वी बॉलीवूड अभिनेता विकी कौशलचा ( Vicky Kaushal ) ‘बॅड न्यूज’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. याच चित्रपटातील त्याचं ‘तौबा-तौबा’ गाणं चांगलंच गाजलं होतं. प्रसिद्ध पंजाबी गायक करण औजलाने गायलेल्या ‘तौबा-तौबा’ गाण्याने अक्षरशः सगळ्यांना वेड लावलं होतं. या गाण्यातील विकीने केलेल्या हूकस्टेपची चांगलीच भुरळ पडली होती. प्रत्येक वयोगटातील लोकं या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसले. अजूनही विकीच्या ‘तौबा-तौबा’ गाण्याची क्रेझ कायम आहे. अशातच या गाण्यावरील आजीबाईंच्या ग्रुपचा डान्स पाहून विकी कौशल भारावला. या डान्स व्हिडीओवरील त्याची प्रतिक्रिया सध्या व्हायरल झाली आहे.

‘शांताई सेकंड चाइल्डहूड’ या इन्स्टाग्राम पेजवरील आजीबाईंच्या ग्रुपचे डान्स व्हिडीओ नेहमी व्हायरल होतं असतात. असाच ‘तौबा-तौबा’ गाण्यावरील आजीबाईंच्या ग्रुपचा डान्स व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला होता. या व्हिडीओमध्ये सहा आजीबाई विकीच्या ( Vicky Kaushal) गाण्यावर जबरदस्त डान्स करताना पाहायला मिळाल्या होत्या. हाच डान्स व्हिडीओ नुकताच विकी कौशलने पाहिला. व्हिडीओतील आजीबाईंचा डान्स पाहून त्याला प्रतिक्रिया देणं राहावलंच नाही.

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम इरिनाचा गणेशोत्सवात जबरदस्त डान्स, नेटकरी कौतुक करत म्हणाले, “ही आपली संस्कृती आहे…”

या आजीबाईंच्या ग्रुप डान्स व्हिडीओवर आधी अभिनेता अमेय वाघने विकीला टॅग करत प्रतिक्रिया दिली. अमेयने लिहिलं की, विकी भाऊ बघा…तुमची प्रतिक्रिया आलीच पाहिजे. त्यानंतर विकीने ( Vicky Kaushal ) आजीबाईंच्या ग्रुप डान्स व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली. त्याने भावुक झालेले तीन इमोजी शेअर करून त्यापुढे हार्टचे इमोजी दिले आहेत. विकीच्या या प्रतिक्रियेमुळे या आजीबाईंच्या ग्रुपचा ‘तौबा-तौबा’ गाण्यावरील डान्स व्हिडीओ पुन्हा चर्चेत आला आहे.

हेही वाचा – “अभी तो खेल शुरु हुआ हैं…” म्हणत विशाखा सुभेदारने पंढरीनाथ कांबळेचं केलं कौतुक, म्हणाली, “अंदाजे तुझं वय वर्षे ५२ असावं, पण…”

हेही वाचा – “आता मी ट्रॉफी आणि जावई घेऊनच येते घरी”, अंकिता वालावलकरच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली, “बाबा…”

कतरिनाशिवाय विकीने लालबागच्या राजाचं घेतलं दर्शन

दरम्यान, नुकतंच विकी कौशलने ( Vicky Kaushal ) लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळी पत्नी कतरिना कैफ दिसली नाही. तो एकटा लालबागच्या राजाचं दर्शन घेताना पाहायला मिळाला. यावेळी अभिनेत्री ईशा देओलबरोबर विकीची भेट झाली. या भेटीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. विकीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याच्या ‘छावा’ चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपट आहे. या चित्रपटात विकीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. ‘छावा’ चित्रपटात विकीसह बरेच मराठी कलाकार पाहायला मिळणार आहे. ६ डिसेंबर हा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होणार आहे.