Vicky Kaushal Katrina Kaif Antilia Ganpati Darshan Video: बॉलीवूडचे लाडके जोडपे विकी कौशल आणि कतरिना कैफ मुलगा विहानच्या जन्मापासून सार्वजनिक कार्यक्रमांपासून काहीसे दूर होते. अनेक प्रसंगी विकी एकटाच हजेरी लावत होता, तर कतरिना आपल्या बाळासोबत वेळ घालवत होती. मात्र, मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील ‘अँटिलिया’ निवासस्थानी आयोजित भव्य गणेशोत्सवात या दोघांनी एकत्र हजेरी लावून चाहत्यांना मोठं सरप्राइज दिलं. पारंपरिक अवतारात बाप्पाच्या चरणी नतमस्तक झालेल्या या जोडीचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होत आहे.
मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील ‘अँटिलिया’ निवासस्थानी गणेशोत्सवाचा भव्य उत्सव साजरा करण्यात आला. ‘अँटिलियाचा राजा’चे पारंपरिक रीतीरिवाज, आकर्षक सजावट आणि ढोल-ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात आगमन झाले. बाप्पाच्या दर्शनासाठी अनेक बॉलीवूड कलाकार नटून-थटून पोहोचले होते. अंबानींचे घर झेंडूची फुले, सुंदर रोषणाई आणि आकर्षक सजावटीने उजळून निघाले होते. या सोहळ्यात विकी व कतरिनाने लक्ष वेधून घेतले.
विकी कौशलने नक्षीकाम असलेला शॉर्ट कुर्ता व पँट असा लूक केला होता. तर कतरिना ऑलिव्ह ग्रीन रंगाच्या पारंपरिक अनारकली ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. वर्क नसलेला साधा ड्रेस व त्यावरील भरजरी ओढणी, त्याच्यावर कतरिनाने गळ्यात नेकलेस व मॅचिंग कानातले घालून लूक पूर्ण केला. तिने केस मोकळे सोडले होते. कतरिना व विकीच्या लूकची सध्या खूपच चर्चा होत आहे.
पाहा विकी-कतरिनाचा व्हिडीओ-
विकी-कतरिनाने बाप्पाचे हात जोडून दर्शन घेतले. त्यानंतर कतरिनाने बाप्पाच्या चरणी डोकं टेकवलं. त्यानंतर दोघांनी बाप्पाला फुलं अर्पण केली. त्यांचा हा व्हिडीओ पल्लव पालिवाल या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
कतरिना कैफने बाप्पांच्या चरणी डोकं टेकवलं अन्…
दरम्यान, विकी व कतरिनाचे अंबानींच्या घरचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी त्यावर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सर्वांना त्यांचा लूक तर आवडलाच, पण त्याचबरोबर अनेकांनी कतरिनाच्या केसांचं खूप कौतुक केलं आहे. कतरिनाचे लांबसडक, काळेभोर केस खूपच सुंदर दिसत असल्याच्या कमेंट्स या व्हिडीओंवर पाहायला मिळत आहेत. दरम्यान, तुम्हालाही विकी व कतरिनाचा लूक कसा वाटला ते नक्की सांगा.
