Katrina Kaif Vicky Kaushal Son Vihaan Face Revealed to paparazzi: पडद्यावर विविध भूमिका साकारणाऱ्या कलाकारांबद्दल चाहत्यांच्या मनात कायमच एक उत्सुकता असते. ते खऱ्या आयुष्यात कसे राहतात, त्यांची लाईफस्टाइल कशी असते, त्यांचे इंडस्ट्रीमधील कोण मित्र-मैत्रीणी आहेत, या सगळ्याबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता असते. याबरोबरच, कलाकारांच्या मुलांबद्दल जाणून घेण्यास, त्यांची एक झलक पाहण्यासाठीदेखील चाहते उत्सुक असतात. त्याबद्दल जाणून घेण्यासाठी विविध प्रयत्न करताना दिसतात.
रणबीर कपूर व आलिया भट्टची लेक राहा कपूर, रणवीर सिंह व दीपिका पादुकोण यांची लेक दुवा, बिपासा बासू व करण सिंह ग्रोव्हरची मुलगी देवी तसेच, करीना कपूर खान व सैफ अली खान यांची मुले तैमुर व जेह यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात.
सामान्यांसह अनेक कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असतात. अनेकदा ते त्यांच्या मुलांचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. तसेच, काही वेळा त्यांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करतात. काही वेळा त्यांच्या शाळेतील छोट्या छोट्या गोष्टी सांगतात. याबरोबरच, आई-वडिलांबरोबर प्रवास करताना पापाराझी त्यांचे व्हिडीओ, फोटो काढतात. हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.
असे असले तरी आता अनुष्का शर्मा-विराट कोहली, कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा आणि अशा अनेक कलाकारांनी त्यांच्या मुलांचे चेहरे अद्याप दाखवले नाहीत, सर्वांसमोर आणले नाही. यामध्ये कतरिना कैफ व विकी कौशल यांचाही समावेश होतो. त्यांच्या मुलाचा फोटोही आतापर्यंत चाहत्यांना पाहायला मिळाला नाही. मात्र, नुकतेच कतरिना कैफ व विकीने त्यांच्या मुलाला विहानला पापाराझींसमोर आणले होते.
कतरिना कैफ व विकी कौशलने पहिल्यांदाच दाखवला पापाराझींना विहानचा चेहरा
नुकतेच कतरिना व विकी मुंबईच्या विमानतळावर दिसले. तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगादेखील होता. मात्र, विहानचा फोटो काढू नये, अशी त्यांनी विनंती केली. एका पापाराझीने सांगितले की विहानचा फोटो काढू नका, अशी विनंती कतरिनाने केली. मात्र, या सेलिब्रिटी जोडप्याने त्यांच्या मुलाचा चेहरा पापाराझींना दाखवला.
काहीच दिवसांपूर्वी कतरिनाने विकीच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या.
विकी व कतरिनाबद्दल बोलायचे तर त्यांनी २०१९ मध्ये डेट करण्यास सुरूवात केले. २०२१ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. २०२५ मध्ये त्यांच्या मुलाचा जन्म झाला.
