Premium

“भांडी घासणं, पंखा पुसणं अन्…”, विकी कौशल घरात करतो ‘ही’ कामं, खुलासा करत म्हणाला…

अभिनेता विकी कौशलने केला वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा…

vicky kaushal reveals he knows all basic household work
अभिनेता विकी कौशलला करता येतात घरची 'ही' कामं

अभिनेता विकी कौशल सध्या ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘मसान’, ‘उरी’, ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटांच्या माध्यमांतून अभिनेता विकी कौशल प्रसिद्धीझोतात आला. आज बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये विकीचं नाव घेतलं जातं. मूळचा पंजाबी असलेल्या विकी कौशलचं संपूर्ण बालपण मुंबईत गेलं. अभिनेता अतिशय सामान्य कुटुंबात लहानाचा मोठा झाला. बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांसाठी विकीने सहायक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत विकीने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : Video : गणपती विसर्जन सोहळ्यात जान्हवी कपूरचा कथित बॉयफ्रेंडसह भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

विकीने ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’च्या निमित्ताने अलीकडेच ‘द कर्ली टेल्स’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्याला “तुला घरची काम करता येतात का?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेता म्हणाला, “माझा भाऊ सनी अतिशय सुंदर जेवण बनवतो. मला जेवण बनवता येत नाही. पण, चहा आणि अंड्याचे पदार्थ मी बनवू शकतो.”

हेही वाचा : ‘शुभविवाह’ फेम मधुरा देशपांडेने सांगितला नवऱ्याबरोबरच्या पहिल्या डेटचा भन्नाट किस्सा; म्हणाली….

“जेवणाव्यतिरिक्त विचाराल, तर मी खूप चांगली भांडी घासतो. संपूर्ण लॉकडाऊनमध्ये मी घरी भांडी घासायचो. माझी उंची जास्त असल्याने मी घरातील सगळे पंखे व्यवस्थित साफ करतो, घरात झाडू मारतो… अशी सगळी कामं मला येतात पण, लादी पुसता येत नाही. बाकी बेडशीट वैगरे घालणं या गोष्टी मला जमत नाहीत. ती कामं तू सनीकडून करून घे…असं मी माझ्या आईला सांगतो.” असं विकी कौशलने सांगितलं.

हेही वाचा : ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का? करायची मॅकडोनाल्डमध्ये काम

दरम्यान, अभिनेता विकी कौशलचा ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये त्याच्यासह मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच विकी कौशल मुख्य भूमिकेत असलेला बहुचर्चित ‘सॅम बहादूर’चित्रपट येत्या वर्षाखेरीस प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vicky kaushal reveals he knows all basic household work in recent interview sva 00

First published on: 24-09-2023 at 17:23 IST
Next Story
परिणीती चोप्रा-राघव चड्ढा यांनी लग्नासाठी उदयपूरचीच का निवड केली? ‘या’ व्यक्तीने सुचवलं होतं नाव