अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांची जोडी बॉलीवूडमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०२१ मध्ये या दोघांनी राजस्थानमध्ये थाटामाटात लग्न केलं. विकी-कतरिनाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. या लोकप्रिय जोडप्याने अद्याप एकाही चित्रपटात एकत्र काम केलेलं नाही. नुकत्याच एका मुलाखतीत विकीने लाडक्या बायकोसह केव्हा काम करणार याबाबत खुलासा केला आहे.




कतरिनाबरोबर ऑनस्क्रीन केव्हा काम करणार या प्रश्नावर विकी कौशल म्हणाला, “आम्हाला दोघांनाही याची कल्पना आहे की, चाहते आम्हाला मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. मी आणि कतरिना आम्ही दोघंही अशा एका चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात आहोत. त्यामुळे अजून आम्ही एकत्र काम केलेलं नाही.”
हेही वाचा : अमिताभ बच्चन यांच्यासमोर हात जोडले, पाया पडला अन्…; ७ कोटींच्या प्रश्नाआधी भावुक झाला स्पर्धक, पाहा व्हिडीओ
विकी पुढे म्हणाला, “आम्ही दोघंही त्या संबंधित विषयाशी कनेक्ट होणं जास्त गरजेचं आहे. केवळ एकत्र काम करायचंय म्हणून आलेला आम्ही कोणताही चित्रपट साइन करणार नाही. आम्हाला दोघांनाही आवडेल अशाच चित्रपटात आम्ही एकत्र काम करणार आणि सध्या तरी आम्ही अशा एका चांगल्या स्क्रिप्टची वाट पाहतोय.”
हेही वाचा : अभिनेता आदिनाथ कोठारेच्या लेकीनं बाप्पाला दिल्या हेल्थ टिप्स; पाहा व्हिडीओ
दरम्यान, विकी कौशल लवकरच मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरबरोबर ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ या चित्रपटात काम करणार आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या अभिनेत्याच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.