Premium

सारा व विकीच्या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती, ‘जरा हटके जरा बचके’ने पहिल्या दिवशी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

Zara Hatke Zara Bachke Box Office Collection Day 1 : विकी कौशल व सारा अली खानच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली?

Zara Hatke Zara Bachke Box Office Collection Day 1
'जरा हटके जरा बचके' पहिल्या दिवसाची कमाई

विकी कौशल आणि सारा अली खान यांचा ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपट शुक्रवारी २ जून रोजी प्रदर्शित झाला. विकी व सारा गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाचं जोरदार प्रदर्शन करत होते. दोघांचे चाहतेही हा चित्रपट प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत होते. चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – महाकाल मंदिरात दर्शन घेतल्याने सारा अली खानला ट्रोल करणाऱ्यांना विकी कौशलने सुनावलं, म्हणाला…

‘जरा हटके जरा बचके’वर चित्रपटाबद्दल समीक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण, प्रेक्षकांनी पहिल्या दिवशी चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली होती. चित्रपटाचे एकूण बजेट ४० कोटी रुपये आहे. अशातच या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली आहे. ‘इंडिया टीव्ही’च्या वृत्तानुसार, पहिल्या दिवशी चित्रपटाने जवळपास पाच कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

शारीरिक संबंधांना खेळ म्हणून मान्यता, ‘या’ देशात होणार पहिली सेक्स चॅम्पियनशिप

‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद बघता वीकेंडला कमाईत मोठी वाढ होऊ शकते. या चित्रपटाच्या नाईट शोमध्ये वाढ होऊ शकते, असंही अनेक व्यापार विश्लेषकांचं मत आहे. हे सुरुवातीचे आकडे व अंदाज आहे. पण सारा व विकीचा हा चित्रपट प्रेक्षकांना पसंतीस पडत असल्याचं दिसत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-06-2023 at 08:49 IST
Next Story
दीपिका पदुकोणला १८ व्या वर्षी ब्रेस्ट इम्प्लांट करण्याचा मिळालेला सल्ला; अभिनेत्री म्हणाली, “इतक्या कमी वयात…”