विकी कौशल आणि सारा अली खानच्या ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू आहे. हा चित्रपट आज २ जूनला प्रदर्शित झाला. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगसाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे. या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंगही हाऊसफुल्ल झाल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा- महाकाल मंदिरात दर्शन घेतल्याने सारा अली खानला ट्रोल करणाऱ्यांना विकी कौशलने सुनावलं, म्हणाला…




‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाची जवळपास २२ हजार तिकिटे विकली गेली आहेत. अंदाजानुसार, हा चित्रपट पहिल्या दिवशी ४ कोटी रुपये कमावू शकतो. ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटाव्यतिरिक्त दुसरा कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर नसल्यामुळे या गोष्टीचा फायदा या चित्रपटाला होऊ शकतो. तर दुसरीकडे चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ‘बाय वन गेट वन फ्री’ म्हणजेच एक तिकीट खरेदी केल्यावर वन तिकीट फ्री ऑफर दिली जात होती. याचा फायदाही या चित्रपटाला झाला आहे.
हेही वाचा- दोन विवाहित अभिनेत्यांबरोबर होतं श्रीदेवी यांचं अफेअर, दोघांच्याही पत्नींना कळलं अन्…
चित्रपटाची कथा इंदूरमधील मध्यमवर्गीय जोडप्यावर आधारित आहे. कपिल आणि सौम्या एकत्र कॉलेजमध्ये असताना प्रेमात पडतात. त्यानंतर घरच्यांच्या संमतीने दोघांचे लग्न होते, परंतु कालांतराने संपूर्ण चित्र बदलून लग्नानंतर भांडणे वाढतात. दोघांमधील भांडण इतके वाढते की, प्रकरण कोर्टात जाऊन घटस्फोटापर्यंत पोहोचते. ट्रेलरमध्ये कपिल आणि सौम्या एकीकडे एकांतात प्रेम करताना आणि दुसरीकडे कुटुंबासमोर भांडताना दिसत आहेत. त्यामुळे चित्रपटात नेमका काय ट्विस्ट येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.