Vicky Kaushal and Katrina Kaif: बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफने १६ जुलै रोजी तिचा ४३ वा वाढदिवस कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींबरोबर साजरा केला. तिचा वाढदिवस साध्या, पण खास पद्धतीने साजरा झाल्याचे सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या एका फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.
कतरिना कैफचा पती व अभिनेता विकी कौशलने कतरिनाच्या वाढदिवसाचा एक फोटो सोशल मीडियावर केला आहे. त्याचा हा फोटो आणि त्याने दिलेल्या शुभेच्छा लक्ष वेधून घेत आहेत. त्याच्या या फोटोंमधून अभिनेत्रीच्या वाढदिवसाची झलक पाहायला मिळत आहे. विकीची पोस्ट लक्ष वेधून घेत आहे.
विकी कौशलने शेअर केला खास फोटो
विकीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तो कतरिनाला प्रेमाने मिठी मारताना दिसत आहे. विकीच्या हातात केक आहे. दोघांच्या चेहऱ्यावर गोड हसू असल्याचे दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, चाहत्यांकडून त्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव होत आहे. विकीने ही पोस्ट शेअर करताना ‘जान का जन्मदिन’, अशी कॅप्शन दिली आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनीही कमेंट्स करीत कतरिनाला शुभेच्छा दिल्या.
दिग्दर्शका व कोरिओग्राफर फराह खान, फॅशन स्टायलिस्ट अमनदीप कौर, करीना कपूर खान अशा अनेक कलाकारांनी कतरिनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
विकीचा भाऊ सनी कौशलनेदेखील कतरिनाला खास शुभेच्छा दिल्या. ‘हॅपी बर्थडे कतरिना’ असा बॅनर असलेला फोटो शेअर करीत त्याने कतरिनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या जोडीचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या केमिस्ट्रीची, त्यांच्यातील बॉण्डिंगची सतत चर्चा होताना दिसते. विकी आणि कतरिना कायमच एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करीत असतात. काही वेळा काही खास क्षणांचे फोटो ते शेअर करतात. चाहते त्यांच्या फोटो, व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव करतात.
या जोडप्याने डिसेंबर २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांनी राजस्थानमध्ये लग्न केले होते. ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसे बोलत नाहीत. मात्र, त्यांच्याबद्दल जाणून घेण्यास चाहते कायमच उत्सुक असतात. ७ नोव्हेंबर २०२५ ला त्यांना मुलगा झाला. त्यांच्या मुलाचे नाव विहान, असे आहे.
विकी कौशलच्या कामाबद्दल बोलायचे तर, तो लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात त्याच्याबरोबर रणबीर कपूर व आलिया भट्ट प्रमुख भूमिकांत असणार आहेत.
