Vicky Kaushal shares romantic photo with wife Katrina Kaif: कतरिना कैफ व विकी कौशल हे बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडपे आहे. त्यांची केमिस्ट्री कायमच लक्ष वेधून घेत असते. सोशल मीडियावर ते विविध फोटो शेअर करतात. ते फोटो शेअर करताना ते त्यांच्या भावनाही व्यक्त करतात. त्यांच्या खासगी आयुष्याची झलक या पोस्टमधून पाहायला मिळते.

विकी कौशलने शेअर केला कतरिना कैफबरोबर रोमँटिक फोटो

पावसाला सुरुवात झाली आहे. सामान्यांसह अनेक कलाकार पावसात भिजताना, पावसाचा आनंद घेताना दिसत आहे. काहीजण रील्सदेखील शेअर करत आहेत. विकी आणि कतरिनासुद्धा पावसाचा आनंद घेताना दिसत आहे. विकीने याची झलक दाखवणारा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

विकी शेअर केलेल्या फोटोत दिसते की ते दोघेही बाहेर बघत आहेत. हा फोटो शेअर करताना अभिनेत्याने, “पाऊस आणि तू”, अशी सुंदर कॅप्शन दिली आहे. तसेच, फिर से कहो हे गाणे लावले आहे. त्यांच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले, “काही क्षणांना शब्दांची गरज नसते”, दुसऱ्या एकाने लिहिले, “किती सुंदर फोटो आहे”, आणखी एकाने लिहिले, “खूप गोड”, एकाने लिहिले, “पुरूष त्याच्या पॉकेटमध्ये ठेऊ शकतो, असा हा फोटो आहे”, दुसऱ्या एकाने लिहिले, “या फोटोने मला रडवले”, एकाने लिहिले, “जेव्हा विहान मोठा होईल तेव्हा तो त्याच्या पॉकेटमध्ये हा फोटो ठेवू शकतो”, आणखी एकाने लिहिले, “त्यांच्यासारखे बॉण्डिंग पाहिजे”, एकाने लिहिलि,”प्रेमळ लोक”, आणखी एकाने लिहिले, “बॉलीवूडमधील बेस्ट कपल”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

अनेकांनी त्यांच्यातील केमिस्ट्रीचे, त्यांच्यातील बॉण्डिंगचे कौतुक केले आहे. तर अनेकांनी त्यांच्या मुलाची विहानची चौकशी केली आहे. तो कुठे आहे, असे विचारले आहे.

विकी व कतरिनाबद्दल बोलायचे तर त्यांनी २०१९ मध्ये डेट करण्यास सुरूवात केले. २०२१ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. २०२५ मध्ये त्यांच्या मुलाचा जन्म झाला.

दरम्यान, विकी कौशल लवकरच लव्ह अँड वॉर सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्याच्याबरोबर रणबीर कपूर आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत असणार आहेत.