Katrina Kaif Vicky Kaushal Photo: कतरिना कैफ व विकी कौशलच्या लग्नाला मंगळवारी, ९ डिसेंबरला ४ वर्षे झाली. मुलाच्या जन्मानंतर हा त्यांच्या लग्नाचा पहिलाच वाढदिवस होता. लग्नाच्या वाढदिवशी विकी कौशलने पत्नी कतरिनाबरोबरचा एक सुंदर फोटो पोस्ट केला. यात बाळाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच कतरिनाची झलक पाहायला मिळाली.
विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी ९ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील एका भव्य किल्ल्यात लग्न केलं होतं. दोघांचा शाही विवाहसोहळा सिक्स सेन्सेस फोर्ट येथे पार पडला होता. दोघांनी एका भव्य आणि खासगी समारंभात लग्न केलं होतं. या लग्नाला विकी व कतरिनाचे कुटुंबीय आणि काही मोजकेच पाहुणे उपस्थित होते.
विकी व कतरिना लग्नानंतर ४ वर्षांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये एका मुलाचे आई-बाबा झाले. ९ डिसेंबर २०२५ रोजी त्यांनी लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा केला. विकीने कतरिनाबरोबरचा एक फोटोही शेअर केला. फोटोत दोघांनी मिठी मारली आहे. विकी कतरिनाकडे पाहतोय, तर कतरिना कॅमेऱ्याकडे पाहतेय.
पाहा पोस्ट
“आजचा दिवस सेलिब्रेट करतोय… आनंदी, कृतज्ञ आणि अपूरी झोप. आम्हाला लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा,” असं कॅप्शन विकी कौशलने या फोटोला दिलं आहे.
विकी कौशलच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे. तसेच कमेंट्स करून विकी व कतरिनाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
विकी कौशलबद्दल बोलायचं झाल्यास तो शेवटचा ‘छावा’ सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत झळकला होता. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या सिनेमात रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, विनीत सिंह, संतोष जुवेकरसह अनेक कलाकार होते. दुसरीकडे कतरिना बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. सध्या ती बाळाबरोबर वेळ घालवत आहे.

