चित्रपटगृहात एकापेक्षा एक चित्रपट दाखल होत असतानाच विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेल्या ‘छावा’ चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर हा टीझर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाचा टीझर सध्या प्रेक्षकांचे मन जिंकून घेत असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या टीझरच्या सुरुवातीला विकी कौशलचा रुद्र अवतार पाहायला मिळत आहे. प्रचंड संख्या असलेल्या सैनिकांवर तो छावा, असे मोठ्याने म्हणत चाल करून जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

karnataka government on sbi pnb banks
“SBI व PNB मधील सर्व खाती बंद करा, ठेवी काढून घ्या”, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय, सरकारी विभागांना दिले आदेश!
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Manu Bhaker's Father Statement on His Daughter and Neeraj Chopra Marriage Rumors
Manu Bhaker Neeraj Chopra: मनू भाकेर-नीरज चोप्राची सोयरीक जुळली? मनूच्या वडिलांनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले, “नीरजला आम्ही…”
antim panghal sent back to india
Paris Olympic 2024: ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये बहिणीची ‘तस्करी’ करणाऱ्या अंतिम पांघालची भारतात रवानगी
Vinod Kambli new video after viral helth issue video
Vinod Kambli Video: विनोद कांबळीच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओनंतर नवा व्हिडीओ समोर; स्वतःच म्हणाला, “माझी प्रकृती…”
Abhishek Bachchan reacts on divorce rumors with Aishwarya Rai
ऐश्वर्या रायपासून घटस्फोट घेण्याच्या चर्चांवर अखेर अभिषेक बच्चनने सोडलं मौन; म्हणाला…
vijender singh on vinesh phogat disqualified
Vinesh Phogat Disqualification: “सरळ बॅगा उचला आणि…”, विनेश फोगटच्या अपात्रतेवर विजेंदर सिंग संतापला; म्हणाला, “१०० ग्रॅमसाठी…”
Munawar Faruqui
Munawar Faruqui : “हे कोकणी लोक कायम…”, मुनव्वर फारुकीकडून मराठी माणसाबाबत अपशब्द; मनसे आक्रमक

“विकी कौशलला अशा रूपात कधीही पाहिले नव्हते”

आता हा टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांचा आनंद ओसंडून वाहत असल्याचे पाहायला मिळत आहे. एका नेटकऱ्याने या टीझरमधील एक भाग सोशल मीडियावर शेअर करीत, “हा चित्रपट उत्तम असणार आहे. हा चित्रपट महाराष्ट्रात बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड मोडेल, असा विश्वास वाटतोय” असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्यानेदेखील, “टीझर पाहिल्यानंतर हा चित्रपट महाराष्ट्रातील जनतेला वेड लावेल” अशा भावना व्यक्त केल्या आहेत. एका नेटकऱ्याने एक्स अकाउंटवर चित्रपटाचा टीझर शेअर करीत म्हटले, “स्त्री-२ चित्रपटासोबत छावा चित्रपटाचा टीझर चित्रपटगृहात दाखविला जात आहे. विकी कौशलला अशा रूपात कधीही पाहिले नव्हते”, असे म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरुण धवनची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘बेबी जॉन’ आणि विकी कौशलचा ‘छावा’ या चित्रपटांचे टीझर स्त्री-२ या सिनेमासोबत जोडले आहेत.

अभिनेता विकी कौशलने या चित्रपटात संभाजी महाराजांची भूमिका साकारली असून, लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना येसूबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. महत्त्वाचे म्हणजे विकी कौशल आणि रश्मिका मंदाना पहिल्यांदाच ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात मराठी अभिनेता संतोष जुवेकरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा : “देशप्रेम हे वांझोटं…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने मार्मिक पोस्ट लिहित स्वातंत्र्य दिनाच्या दिल्या शुभेच्छा, म्हणाले, “लाल किल्यावरून भाषणं देऊन….

सोशल मीडियावर ज्या प्रकारे छावा या चित्रपटाचे कौतुक होत आहे, त्यावरून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्याबरोबरच चाहते विकी कौशलला आतापर्यंत कधीही न पाहिलेल्या अवतारात पाहण्यासाठी उत्सुक असल्याचेदेखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच विकीचा या चित्रपटातील पहिला लूक प्रेक्षकांसमोर आला होता. डिसेंबर २०२४ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जात आहे. आता ज्याप्रमाणे टीझरला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे, त्याचप्रमाणे चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विकीच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बॅड न्यूज या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता, आता हा छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे.