scorecardresearch

Premium

विकी कौशलच्या ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ची पहिल्या दिवशी निराशाजनक कामगिरी, केली ‘इतकी’ कमाई

The great indian family box office collection day 1 : विकी कौशलच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली? जाणून घ्या

The great indian family
विकी कौशलच्या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ

विकी कौशलचा ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ हा चित्रपट २२ सप्टेंबर रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. जरा हटके जरा बचके या चित्रपटाच्या यशानंतर विकीचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी ओपनिंग करेल, याकडे लक्ष लागलं होतं. आकडेवारीनुसार पहिल्याच दिवशी चित्रपटाने निराशाजनक कामगिरी केली आहे.

“…तर आता माझ्या हातात एखादं बाळ असतं,” गौतमी पाटीलचं वक्तव्य; म्हणाली, “कोणत्याही मुलीला…”

Rajveer Deol Paloma-starrer Dono box office collection day 1
सनी देओलचा मुलगा अन् पूनम ढिल्लोंच्या मुलीचं बॉलीवूड पदार्पण, राजवीर-पलोमाच्या ‘दोनों’ने कमावले फक्त ३० लाख रुपये
ms-dhoni flim-completed-7-year
Video “आपण निरोप घेऊ शकलो नाही पण…”; सुशांतच्या आठवणीत दिशा पटानी भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाली…
The Vaccine War box office collection day 1
नाना पाटेकर यांच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’कडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, पहिल्या दिवसाची कमाई निराशाजनक, वाचा आकडे
jawan box office collection day 4
‘जवान’ने रविवारी रचला इतिहास! चौथ्या दिवशी केली जबरदस्त कमाई; ‘पठाण’सह ‘KGF 2’, ‘बाहुबली २’ चा रेकॉर्ड मोडला, वाचा आकडे

सुरुवातीच्या अंदाजानुसार, ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ने पहिल्या दिवशी १.४० कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाकडे एकंदरीत प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं दिसत आहे. पहिल्या दिवसाची कमाई बघता चित्रपटाला नुकसान होण्याची शक्यता आहे. यापूर्वीचा विकी व साराच्या ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ५.४९ कोटी रुपये कमावले होते.

या चित्रपटात विकीने भजन कुमार नावाची भूमिका साकारली आहे. “या चित्रपटाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा चित्रपट संपल्यानंतर, प्रेक्षक त्यांच्या कुटुंबासह चेहऱ्यावर हास्य घेऊन त्यांच्या घरी परत जातील. मी पहिल्यांदा चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकली तेव्हाही माझ्याही त्याच भावना होत्या,” असं विकी एका मुलाखतीत म्हणाला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vicky kaushal starrer the great indian family box office collection day 1 hrc

First published on: 23-09-2023 at 13:05 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×