scorecardresearch

Premium

‘लालबागचा राजा’च्या दर्शनाला गेलेला विकी कौशल गर्दीत अडकला; पोलिसांनी केली मदत, व्हिडीओ व्हायरल

भाविक अन् चाहत्यांच्या गर्दीत अडकला विकी कौशल, व्हिडीओ होतोय व्हायरल

vicky kaushal stuck in crowd at lalbaugcha raja
विकी कौशल गर्दीत अडकला (फोटो – व्हिडीओतून स्क्रीनशॉट)

सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. अनेकांच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. मुंबईत तर गणेशोत्सवानिमित्त प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. लोक शहरातील मानाच्या गणपतींच्या दर्शनासाठी जात आहेत. इतकंच नाही तर सेलिब्रिटीही विविध ठिकाणी बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी जात आहेत. अशातच अभिनेता विकी कौशलचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

“देशभक्तीचा दाखला…”, मुंबईतील कॉन्सर्ट रद्द झाल्यावर कॅनेडियन रॅपरचं स्पष्टीकरण; भारताबद्दल केलेली वादग्रस्त पोस्ट

Bollywood drama queen rakhi sawant
Video: “ही पागल होत चालली आहे…” राखी सावंतच्या ‘त्या’ व्हिडीओवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
Kulhad Pizza Sehaj Arora Commits Suicide Says Viral News Team Gives Explanation After Viral Sex Clip Video Controversy
कुल्हड पिझ्झाच्या सेहज अरोराने केली आत्महत्या? अंत्यसंस्काराच्या क्लिप झाल्या व्हायरल, पाहा खरी पोस्ट
Parineeti Chopra-Raghav Chadha
परिणीती चोप्रा-राघव चड्ढा यांच्या संगीत सोहळ्यातला व्हिडीओ व्हायरल; नवराज हंसच्या गाण्यावर पाहुण्यांचा जबरदस्त डान्स
Dnyanada supriya
‘ठिपक्यांची रांगोळी’तील अप्पूने सांभाळलं सुप्रिया पाठारेंच्या लेकाच्या हॉटेलचं कॅश काउंटर, जाणून घ्या नेमकं काय घडलं…

अनेक सेलिब्रिटी लालबागचा राजाच्या दर्शनाला जात आहेत. शिल्पा शेट्टी, वरुण धवन, कार्तिक आर्यनसह अनेकांनी लालबागचा राजाचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर विकीही दर्शनाला पोहोचला. पण त्या ठिकाणी असलेल्या गर्दीत तो अडकला. त्याचाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. विकी आपल्या पालकांबरोबर दर्शनाला पोहोचला होता.

“देवाने सांगितलं नाहीये की…”, गणेशोत्सवातील खटकणाऱ्या गोष्टींबद्दल स्पष्टच बोलला शशांक केतकर

व्हिडीओत दिसतंय की तिथे खूप गर्दी आहे आणि पोलीस त्या गर्दीतून त्याला दर्शनाला नेत आहेत. प्रचंड गर्दी असल्याने पोलिसांना त्याला तिथे सुरक्षित न्यावे लागले. यावेळी गर्दीतून जाताना विकी घामाने भिजल्याचं दिसत आहे. प्रनल चव्हाण नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ‘विकीची अवस्था बघा आणि कल्पना करा की तुमची अवस्था कशी असेल, बाप्पाच्या दरबारात सर्वांना समान वागणूक दिली जाते, सर्वसामान्य आणि व्हीआयपी असा भेदभाव होत नाही. पण धक्काबुक्की सहन करावी लागते’, असं व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं आहे.

लोक या व्हिडीओवर विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. काहींच्या मते बाप्पाच्या दर्शनाला इतकी गर्दी तर असणारच, तर दुसरीकडे काहींनी मात्र गर्दी आणि धक्काबुक्कीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vicky kaushal stuck in crowd at lalbaugcha raja police helped him video viral hrc

First published on: 23-09-2023 at 08:00 IST

संबंधित बातम्या

क्विझ ×