Vidya Balan recreate Bhau Kadam dialogue: विद्या बालन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती अनेक गाण्यांवर तसेच विविध डायलॉगवर रील करत असते. विद्या अनेकदा मराठी गाण्यांवरही रील्स शेअर करताना दिसते. नुकतीच विद्या बालनने शेअर केलेली रील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विद्या बालनने शेअर केली श्रेया बुगडे आणि भाऊ कदम यांच्या स्कीटवर रील

विद्या बालनने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक रील शेअर केली आहे. श्रेया बुगडे आणि भाऊ कदम यांच्या एका स्कीटवर ती अॅक्टिंग करताना दिसत आहे.

हा संवाद असा आहे की श्रेया म्हणते, “मला एक गोष्ट सांगा तुम्ही साऊथ इंडियन आहात, तर रजनीकांतला भेटला असालच”, त्यावर भाऊ कदम म्हणतात, “भेटलो? तो माझा मामा आहे.” श्रेया म्हणते, “काय?”, त्यावर भाऊ कदम म्हणतात, “माझी आई आणि तो सख्खे भाऊ-बहीण आहेत”, श्रेया म्हणते, “सख्खे भाऊ-बहीण?” भाऊ कदम म्हणातात, “एकदा काय झालं, आईने इडली बनवली. त्यांची भांडणं झाली. रागात आकाशात इडली फेकून दिली.” त्यावर श्रेया म्हणते, “इडलीचं काय झालं?” त्यावर भाऊ कदम म्हणतात, “चंद्र…ते पांढरं दिसतं ते काय आहे, ती इडली आहे. मामानं बनवली म्हणून.. चंद्राला, चंदा मामा म्हणतात.” यातील भाऊ कदम यांच्या डायलॉगवर तिने अभिनय केला आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना विद्याने, “काय समजलं? ‘जेलर २’हा सिनेमा १५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा बघायला पाहिजे असे तिने लिहिले. याचबरोबर, तिने ज्या मराठी संवादावर अभिनय केला, तो तिने इंग्रजीतही लिहिला आहे. ‘जेलर २’मध्ये रजनीकांत प्रमुख भूमिकेत आहेत. त्यामुळे रजनीकांत यांचा उल्लेख असलेल्या संवादावर विद्याने रील शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे.

विद्याच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अथर्व सुदामे, मुग्धा गोडबोले, आश्विनी कासार, अमृता सुभाष, अवधूत गुप्ते यांनी हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. सुकन्या मोने यांनी लिहिले, “तू कमाल आहेस”, ऋजुता देशमुख यांनी लिहिले, “वाह, वाह असे लिहित हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत.

दरम्यान, रजनीकांत हा सिनेमा प्रेक्षकांना आवडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.