Premium

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याचे हिमालय पर्वतरांगांमध्ये न्यूड फोटोशूट, म्हणाला, “मी ७ ते १० दिवस…”

विद्युत जामवालने शेअर केले त्याचे न्यूड फोटो, कॅप्शनमध्ये म्हणाला…

vidyut jamwal nude photoshoot
विद्युत जामवालच्या फोटोंची चर्चा

वर्षभरापूर्वी अभिनेता रणवीर सिंहने केलेल्या न्यूड फोटोशूटची चांगलीच चर्चा झाली होती. त्यानंतर आता अभिनेता विद्युत जामवालने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर त्याचे न्यूड फोटो शेअर केले आहे. त्याने तीन फोटो शेअर केले आहेत. त्याचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विद्युत जामवालने त्याचे तीन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये विद्युत जामवाल न्यूड दिसत आहे. एका फोटोमध्ये तो जंगलात नदीच्या काठावर बसलेला दिसतोय, तर एका फोटोत तो नदीत आंघोळ करताना दिसत आहे. एका फोटोंमध्ये विद्युत जामवाल चहा बनवताना दिसत आहे. या सर्व फोटोंमध्ये विद्युत जामवाल कपड्यांशिवाय दिसत आहे. विद्युतने सांगितलं की त्याचे फोटो स्थानिक मेंढपाळ मोहर सिंगने काढले आहेत.

“बॉबीच्या पात्राने माझ्यावर…”, ‘अ‍ॅनिमल’मधील बलात्काराच्या दृश्याचं अभिनेत्रीने केलं समर्थन; म्हणाली, “हा सीन खूपच…”

या फोटोंबरोबर विद्युतने एक मोठं कॅप्शन लिहिलं आहे. हिमालय पर्वतरांगांना माझी रिट्रीट असं त्याने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. तसेच तो मागच्या १४ वर्षांपासून असं करतोय असंही त्याने सांगितलं. “दरवर्षी ७ ते १० दिवस एकटं घालवणं हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर सर्वात कंफर्टेबल आहे आणि मी निसर्गाच्या नैसर्गिक फ्रिक्वेन्सीमध्ये ट्यून करतो,” असं त्याने लिहिलं आहे.

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटामुळे ‘नॅशनल क्रश’ बनलेल्या तृप्ती डिमरीचं शिक्षण किती? जाणून घ्या तिची शैक्षणिक पार्श्वभूमी

“मी घरी परत येताना हवी असलेली उर्जा इथेच निर्माण करतो, माझ्या आयुष्यातील एक नवीन अध्याय अनुभवण्यासाठी इथेच मी तयार होतो. मी आता माझ्या पुढच्या अध्यायासाठी तयार आणि उत्सुक आहे. CRAKK २३ फेब्रुवारी २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे,” असं म्हणत त्याने त्याच्या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणाही केली.

विद्युतचे हे फोटो एका स्थानिक मेंढपाळाने काढलेले आहे. त्याच्या या फोटोंवर चाहते कमेंट्स करत आहेत. त्याच्या फोटोंना पाच लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vidyut jamwal shared naked photos from himalayan ranges hrc

First published on: 10-12-2023 at 11:41 IST
Next Story
Quiz: ‘कॉफी विथ करण’च्या या धमाकेदार क्विजमध्ये सहभागी व्हा अन् पाहा तुम्हाला या शोबद्दल नेमकी किती माहिती आहे?