उद्योगपती विजय मल्ल्या यांनी एका बॉलीवूड अभिनेत्रीचं कन्यादान केलं होतं. या अभिनेत्रीने गोव्यात पारंपरिक मराठी पद्धतीने केलं होतं. अभिनेत्रीने स्वतः याबद्दल माहिती दिली होती.

या बॉलीवूड अभिनेत्रीचं नाव समीरा रेड्डी होय. डीएनएला २०१४ साली दिलेल्या एका मुलाखतीत समीराने स्वतःच सांगितलं होतं. समीराच्या लग्नात तिच्या आईच्या कुटुंबाकडून फक्त विजय मल्ल्या यांनी हजेरी लावली होती.

“विजय मल्ल्या, जे माझ्या आईचे नातेवाईक आहेत, त्यांनी माझं कन्यादान केलं होतं. माझ्या लग्नात त्यांच्या व्यतिरिक्त फक्त मित्र आणि कुटुंबीय होते,” असं समीरा म्हणाली होती. समीरा रेड्डीच्या पतीचे नाव अक्षय वरदे आहे. या दोघांचे लग्न २१ जानेवारी २०१४ रोजी पारंपरिक मराठी पद्धतीने झालं होतं.

समीरा व अक्षयची भेट एका पीआर कार्यक्रमात झाली होती. समीरा ज्या बाईक प्रमोशनच्या इव्हेंटसाठी आली होती, त्याच बाईक कंपनीचा मालक अक्षय वरदे होता. तोही या कार्यक्रमात उपस्थित होता. समीराने म्हटलं होतं की ती पहिल्याच नजरेत अक्षयच्या प्रेमात पडली होती. सहसा मुलं मुलींना प्रपोज करतात किंवा आधी भावना व्यक्त करतात, पण या नात्यात मात्र समीराने पुढाकार घेतला होता. समीराने स्वतः अक्षयचा नंबर मागितला होतो व संपर्क केला होता. दुसरीकडे अक्षयने कधीच कोणत्याही सेलिब्रिटीला डेट केले नव्हतं, त्यामुळे तो समीराला पाहून तो थोडा अनकंफर्टेबल झाला होता.
समीरा व अक्षय यांनी काही काळ एकमेकांना डेट केल्यावर गुपचूप लग्न केलं होतं. तिच्या लग्नात खूप कमी लोक उपस्थित होतं. समीराच्या अनेक मित्र-मैत्रिणींनाही तिच्या लग्नाची माहिती नव्हती.

समीरा ‘अशोक’, ‘दे दना दन’, ‘मुसाफिर’ या चित्रपटांसाठी ओळखली जाते. ११ वर्षांपूर्वी अक्षय वरदे याच्याशी लग्न केल्यानंतर समीराने कामातून ब्रेक घेतला. समीराला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. समीरा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिच्या सासूबाईंबरोबर व्हिडीओ बनवत असते. या सासू सुनेच्या जोडीचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. ती लाइफस्टाइल, तसेच सकारात्मकता व मातृत्वाबद्दलही व्हिडीओ पोस्ट करत असते.