This South Superstar To play An Important Role In Ranbir Kapoor’s Ramayana : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा चित्रपट यावर्षी दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अनेक लोकप्रिय चेहरे पाहायला मिळणार आहेत.अशातच आता ‘रामायण’मध्ये एका दाक्षिणात्य सुपरस्टारचीही वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे.
नितेश तिवारी दिग्दर्शित आणि नमित मल्होत्रा निर्मित ‘रामायण’ या चित्रपटाचं ४०० कोटींचं बजेट आहे. ‘रामायण’ ही पौराणिक कथा यामधून मोठ्या स्केलवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दोन भाग असून पहिला भाग यंदा दिवाळीत प्रदर्शित झाला आहे. यामध्ये रामाच्या भूमिकेत रणबीर कपूर, सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी, लक्ष्मणाच्या भूमिकेत रवी दुबे, रावणाच्या भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेता यश, हनुमानाच्या भूमिकेत सनी देओल, कैकेयीच्या भूमिकेत लारा दत्ता आणि इतर काही लोकप्रिय कलाकार यामध्ये महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारणार आहेत.अशातच आता अजुन एका दाक्षिणात्य अभिनेत्याची यामध्ये वर्णी लागली आहे.
‘रामायण’मध्ये झळकणार ‘हा’ दाक्षिणात्य अभिनेता
रणबीर, साई, यश यांच्याबरोबर आता दाक्षिणात्य अभिनेते विजय सेतुपती यांचीसुद्धा या चित्रपटात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुव्हीज सिंगापूरच्या वृत्तानुसार, ‘रामायण’चे निर्माते चित्रपटातील लंकानरेश रावणाच्या धाकट्या भावाच्या म्हणजेच विभीषणच्या भूमिकेसाठी विजय सेतुपती यांचा विचार करत आहेत. विभीषण सत्य आणि चांगुलपणाचा मार्ग स्वीकारणारा म्हणून ओळखला जातो; कारण युद्धात तो रावणाच्या विरोधात जाऊन प्रभू श्री रामांचं समर्थन करतो. रिपोर्ट्सनुसार ‘रामायण’ची टीम या भूमिकेसाठी विजय यांच्याबरोबर चर्चा करत आहेत. परंतु, अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
‘रामायण’ हा बिग बजेट सिनेमा असून यासाठी लोकप्रिय संगीतकार ए. आर. रहमान व हंस जिमर संगीत देणार आहेत, त्यामुळे चित्रपटातील संगीताबद्दलही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वाधिक बिग बजेट सिनेमा मानला जात आहे. निर्माता गेली ६-७ वर्ष यावर काम करत होता असं त्याने एका मुलाखतीत सांगितलेलं.
दरम्यान, विजय सेतुपती सध्या ‘गांधी टॉक्स’ या सिनेमामुळे चर्चेत आहेत. यामध्ये सिद्धार्थ जाधव व उषा नाडकर्णी, अदिती राव हैदरीसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहेत.
