Vijay Varma reaction on trolling : बॉलीवूड सेलिब्रिटी अनेकदा त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या ब्रेकअपबद्दल, घटस्फोटाबद्दलही चर्चा होत असते आणि यामुळे त्यांना टीकेलाही सामोरं जावं लागतं. गेल्या वर्षी बॉलीवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांचं ब्रेकअप झाल्यानंतर दोघे अनेकांच्या चर्चेचा विषय ठरले. अशातच आता विजयने सोशल मीडियावरील ट्रोलिंगबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

विजयने ‘न्यूज १८’शी संवाद साधताना याबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्याने लोकांबद्दल सोशल मीडियावरुन वाईट बोलणं चुकीचं आहे. आता गोष्टी खूप बदलल्या आहेत चांगल्या माणसांबद्दल नकारात्मक बोललं जातं. विजय नेमकं काय म्हणाला याबद्दल जाणून घेऊयात…

सोशल मीडियावरील ट्रोलिंगबद्दल विजयची प्रतिक्रिया

विजय म्हणाला, “आपल्या लहानपणी सार्वजनिक ठिकाणी कोणाबद्दल वाईट बोलणं योग्य मानलं जात नव्हतं आणि लोकांना ते आवडतही नव्हतं. जो कुणी इतरांबद्दल वाईट बोलायचा, त्यालाच चुकीचं समजलं जायचं. पण, आता सगळंच उलटं झालं आहे. जो लोकांना शिवीगाळ करतो, त्याला कोणी काही म्हणत नाही. उलट ज्याच्यावर हे सगळं होतं, त्याला आधार देण्याऐवजी लोक त्याच्याबद्दलच जास्त वाईट बोलतात.” विजयने पुढे तो झपाट्याने बदलणाऱ्या जगाशी जुळवून घेऊ शकत नाही, असं सांगितलं आहे. अभिनेता म्हणाला, “संपूर्ण संस्कृतीत खूप बदल झाला आहे. लोक आता ज्या पद्धतीने बोलतात आणि कमेंट्स करतात, ते खूपच जास्त थेट आणि वैयक्तिक झालं आहे. कधी कधी त्यात खूप खोटेपणाही असतो.”

विजयने अशावेळी त्याला त्याच्या कुटुंबीयांची मदत झाल्याचं म्हटलं आहे. अभिनेता म्हणाला, “मी अलीकडेच मोठ्या घरात राहायला गेलो आहे. त्यामुळे मी अनेकदा त्यांना भेटण्याचा आणि संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो.” 

माध्यमांच्या वृत्तानुसार दोन वर्षे डेट केल्यानंतर मार्च २०२५मध्ये विजय वर्मा व तमन्ना भाटिया वेगळे झाले. यानंतर तमन्नाने एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत तिला भविष्यातील तिच्या जोडीदारासाठी एक उत्तम पार्टनर व्हायचं आहे. असं म्हटलं होतं.

दरम्यान, विजय वर्मा सध्या त्याच्या ‘मटका किंग” या सीरिजमुळे चर्चेत आहे. येत्या १७ एप्रिलला अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर ही सीरिज रिलीज होणार आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित विजय वर्मा मुख्य भूमिकेत असलेल्या या सीरिजमध्ये त्याच्यासह सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर हे कलाकारसुद्धा झळकणार आहेत.