Vinod Khanna Madhuri Dixit Dayavan Controversial Scene: १९७० आणि ८० च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे दिग्गज अभिनेते विनोद खन्ना आणि बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित यांच्यातील ‘दयावान’ चित्रपटातील तो बोल्ड सीन आजही चर्चेत राहतो. १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात २१ वर्षांच्या नवोदित माधुरीसोबत हा सीन करण्यासाठी ४१ वर्षांच्या विनोद खन्नांनी आपल्या फीमध्ये कपात केली होती, अशी चर्चा आजही रंगते. शूटिंगदरम्यान दिग्दर्शकाने ‘कट’ म्हटल्यानंतरही विनोद खन्ना न थांबल्याने माधुरीच्या ओठाला दुखापत झाली होती. त्यामुळे तिने त्यांच्याबरोबर कधीही काम न करण्याचा निर्णय घेतला होता, असं म्हटलं जातं.
१९७० आणि ८० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेते विनोद खन्ना आपल्या लोकप्रियतेच्या शिखरावर होते. त्यावेळी ते बॉलीवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते होते. पण तरीही त्यांनी १९८८ मध्ये आलेल्या ‘दयावान’ चित्रपटात आपल्यापेक्षा निम्म्या वयाच्या, म्हणजे अवघ्या २१ वर्षांच्या माधुरी दीक्षितबरोबर एका बोल्ड सीनसाठी स्वतःच्या फीमध्ये कपात केली होती, असा दावा काही अहवालांमध्ये केला जातो.
माधुरी दीक्षितला करायचा नव्हता हा सीन
माधुरी दीक्षित त्यावेळी नवोदित अभिनेत्री होती. ती हा सीन करण्यास अजिबात उत्सुक नव्हती. तिने दिग्दर्शक फिरोज खान यांना सांगितलं होतं की ती हा सीन करण्यास कंफर्टेबल नाही. माधुरी त्यावेळी २१ वर्षांची तर विनोद खन्ना ४१ वर्षांचे होते. या वादग्रस्त सीनवरून चित्रपट निर्मात्यांना कायदेशीर नोटिसाही बजावण्यात आली होती, पण दिग्दर्शक फिरोज खान हा सीन चित्रपटात ठेवण्यावर ठाम होते.
माधुरीला झालेली दुखापत
न्यूज १८ च्या वृत्तानुसार, चित्रीकरणादरम्यान हा किसिंग सीन माधुरीच्या अपेक्षेपेक्षा अत्यंत अनपेक्षित आणि त्रासदायक ठरला होता. दिग्दर्शकाने ‘कट’ म्हटल्यानंतरही विनोद खन्ना सीन करत होते आणि त्यांनी तो थांबवला नाही. काही मिनिटांच्या या सीनमध्ये माधुरीच्या ओठाला दुखापत झाल्याने रक्त आले आणि ती घाबरली. या घटनेनंतर विनोद खन्ना यांनी तिची वैयक्तिकरीत्या माफीही मागितली होती.

माधुरी दीक्षित त्या सीनबद्दल काय म्हणाली होती?
‘दयावान’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर या सीनवर चौफेर टीका झाली. खुद्द माधुरीनेही हा भाग चित्रपटातून वगळण्याची विनंती केली होती. मात्र, हा सीन कायम ठेवण्यात आला. चित्रपट जरी बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला, तरी या प्रसंगामुळे दुखावलेल्या माधुरीने पुढे विनोद खन्ना यांच्याबरोबर कधीही काम न करण्याचा निर्णय घेतला. “हा बोल्ड सीन कसा शूट केला जाईल याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. आजही पडद्यावर तो सीन पाहताना मला धक्का बसतो,” असं माधुरी दीक्षित एका जुन्या मुलाखतीत या प्रसंगाची आठवण सांगताना म्हणाली होती.
