scorecardresearch

Premium

Video : गोविंदाचा डान्स पाहून प्रेक्षक झाले थक्क; रणवीर सिंगने तर चक्क केला साष्टांग नमस्कार

गोविंदाचा डान्स संपताच रणवीरने थेट स्टेज गाठले

govinda final
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आज आघाडीचा स्टार म्हणून ओळखला जातो. कधी दीपिकाबरोबर तर कधी फॅशनमुळे तो चर्चेत असतो. रणवीरचा बिनधास्तपणा भावतो. नुकताच त्याचा एका कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात त्याबरोबरीने अर्जुन कपूर, आयुष्यमान खुराणा, मनीष पॉलदेखील दिसत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये रणवीर सिंग त्याच्याबरोबरचे हे कलाकार गोविंदाचा डान्स बघत आहेत. गोविंदा आपल्या नेहमीच्या शैलीत डान्स करताना दिसत आहे. इतर कलाकार, प्रेक्षक याचा आनंद घेत आहेत. गोविंदाचा डान्स संपताच रणवीरने थेट स्टेज गाठले. त्याच्याबरोबरीने इतर कलाकारदेखील आले, मात्र रणवीर स्टेजवर येताच त्याने गोविंदाला साष्टांग नमस्कार घातला. त्याच्या या कृतीमुळे गोविंदादेखील भावुक झाला. फिल्मफेअरच्या कार्यक्रमात हा प्रसंग घडला.

deepa chaudhari gave special gift to dhanashri kadgaonkar son kabir
Video : ‘तू चाल पुढं’मध्ये वैरी तर ऑफस्क्रीन ‘असा’ आहे बॉण्ड, धनश्री काडगावकरच्या लेकाचा अन् दीपा चौधरीचा व्हिडीओ चर्चेत
sonali kulkarni
Video “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”; सोनाली कुलकर्णीने दिला बाप्पाला निरोप, व्हिडीओ व्हायरल
riteish deshmukh shared romantic video with wife genelia deshmukh
‘तुझे मेरी कसम’ ते ‘वेड’, रितेश-जिनिलीयाचा रोमॅंटिक व्हिडीओ चर्चेत; नेटकरी म्हणाले, “दादा-वहिनी…”
how to make brown bread in factory
तुम्हीही हेल्दी समजून “ब्राउन ब्रेड” खाता? ‘हा’ VIDEO पाहाल तर झोप उडेल…नागरिकही संतापले

तितिक्षा तावडेने केलं ‘दृश्यम २’ अभिनेत्याचं कौतुक; म्हणाली “तू खूप मेहनत…”

नव्व्दच्या दशकांत गोविंदाने आपल्या डान्सने तमाम प्रेक्षकांना वेड लावलं होत. ‘आँखे’, ‘स्वर्ग’, ‘हाथकडी’, ‘दिवाना मस्ताना’, ‘कुली नंबर १’, यांसारखे सुपरहिट चित्रपट त्याने दिले आहेत. २००६ साली आलेल्या ‘पार्टन’र चित्रपटामुळे त्याने पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये आपली जादू दाखवून दिली. दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्याबरोबर त्याने अनेक चित्रपटात काम केले.

रणवीर सिंग रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ आणि करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये तो आणि आलिया भट्ट ‘गली बॉय’नंतर पुन्हा एकदा रोमान्स करताना दिसणार आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video ranveer singh arjun kapoor got emotional while seeing govinda dancing did prostration on stage spg

First published on: 20-11-2022 at 10:39 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×