Anant Ambani And Radhika Merchant Pre Wedding Celebration : अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा गुजरातमधील जामनगरमध्ये थाटामाटात पार पडला. या तीन दिवसीय कार्यक्रमाला बॉलीवूड, क्रिकेट ते राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यासाठी जामनगरमध्ये संपूर्ण कलाविश्व अवतरल्याचं पाहायला मिळालं. या प्री-वेडिंग कार्यक्रमातील बरेच फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हॉलीवूड सेलिब्रिटी रिहाना, एकॉन, प्रसिद्ध गायक अरिजित सिंह, श्रेया घोषाल, दिलजीत दोसांझ यांचे खास परफॉर्मन्स या कार्यक्रमात पार पडले. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला बॉलीवूडकरांची मांदियाळी पाहायला मिळाली. पण, या सोहळ्याला काही लोकप्रिय स्टार्सची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली.

हेही वाचा : “तुमची मुलगी असती तर?” कार्यक्रमस्थळी धक्काबुक्की झाल्याने ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरु संतापली, म्हणाली…

बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन वैद्यकीय कारणास्तव या सोहळ्याला गैरहजर राहिल्याचं सांगितलं जात आहे. दुखापत झाल्याची इन्स्टाग्राम स्टोरी हृतिकने शेअर केली होती. तसेच गेल्यावर्षी अनंत-राधिकाच्या साखरपुड्यात मोठ्या उत्साहाने सहभागी झालेला अभिनेता-निर्माता करण जोहर देखील प्री-वेडिंगला गैरहजर होता. करणला त्याच्या सगळ्याच मित्रमंडळींनी यावेळी मिस केलं. प्रियांका चोप्रा व तिचा पती निक जोनस देखील प्री-वेडिंगला येऊ शकले नाहीत. त्यांच्याऐवजी देसी गर्लची आई मधू चोप्रा या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.

हेही वाचा : “बायकोला सांगितलंय आलो तर तुझा नाहीतर…”, ‘संघर्षयोद्धा’चा टीझर प्रदर्शित, मनोज जरांगे पाटलांची भूमिका कोण साकारणार?

विराट-अनुष्काने नुकतीच दुसऱ्या बाळाचा जन्म झाल्याची आनंदाची बातमी इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. सध्या हे जोडपं लंडनमध्ये असल्याने हे दोघंही प्री-वेडिंगला गैरहजर होते. याशिवाय रेखा, काजोल व तिची लेक न्यासा, अजय देवगण, शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा आणि देओल कुटुंबीय या सोहळ्यात सहभागी झाले नव्हते.

दरम्यान, या काही निवडक कलाकारांशिवाय अवघं बॉलीवूड कलाविश्व अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगसाठी जामनगरमध्ये एकत्र जमल्याचं व्हायरल व्हिडीओजमध्ये पाहायला मिळत आहेत. आता येत्या जुलै महिन्यात अनंत-राधिकाचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे.