scorecardresearch

Premium

१३ वर्षांपूर्वी शाहरुखसह विशाल भारद्वाज बनवणार होते ‘हा’ चित्रपट, चित्रीकरणही सुरू होणार होतं, पण…

विशाल आणि शाहरुख एकत्र एक चित्रपट करणार होते पण काही कारणास्तव तो चित्रपट डब्यात गेल्याचं विशाल यांनी सांगितलं

vishal-bhardwaj-shahrukhkhan
फोटो : इंडियन एक्सप्रेस

विशाल भारद्वाज यांची अलीकडेच ‘चार्ली चोप्रा’ नावाची वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. पुढच्या आठवड्यात ते नेटफ्लिक्सवर त्यांचा आगामी चित्रपट घेऊन येत आहे. ‘खुफिया’ नावाच्या या चित्रपटात तब्बू, वामिका गब्बी, अली फजल, अजमेरी हक आणि आशिष विद्यार्थी या कलाकारांची महत्त्वाची भूमिका आहे. विशाल भारद्वाज चित्रपटाच्या संदर्भात वेगवेगळ्या माध्यमांना मुलाखती देत ​​आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी शाहरुख खानबद्दल भाष्य केलं आहे.

‘न्यूज १८’शी बोलताना विशाल भारद्वाज यांनी ‘खुफिया’मध्ये शाहरुख खानचा अप्रत्यक्ष कॅमिओ असणार असल्याचा खुलासा केला आहे. याचाच अर्थ या चित्रपटात शाहरुख जरी दिसणार नसला तरी त्याचा संदर्भ आपल्याला सापडणार आहे. याच मुद्द्यावर भाष्य करताना शाहरुखबरोबर काम करण्याबद्दल विशाल भारद्वाज यांनी एक खुलासा केला आहे.

the vaccine war
विवेक अग्निहोत्रींच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ला सर्वत्र थंड प्रतिसाद, प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचण्यासाठी निर्मात्यांनी दिली ‘ही’ लहास ऑफर
Siddharth on being forced to leave Chithha event in Bengaluru
“मी पैसे खर्च करून…”, राजकीय वादातून आंदोलकांनी चित्रपटाचं प्रमोशन थांबवल्यावर अभिनेत्याची प्रतिक्रिया
akshay-kumar-jawan
‘जवान’चं कलेक्शन शेअर करत खिलाडी कुमारने केलं किंग खानचं अभिनंदन; ट्वीट करत म्हणाला…
why-kareena-loves-mumbai
मुंबई का आवडते? करीना कपूरने सांगितलं खरं कारण; म्हणाली “मला या शहरात…”

आणखी वाचा : ‘द व्हॅक्सिन वॉर’ची बॉक्स ऑफिसवरील स्थिति बिकटच; दोन दिवसांत कमावले फक्त ‘इतके’ कोटी

विशाल आणि शाहरुख एकत्र एक चित्रपट करणार होते पण काही कारणास्तव तो चित्रपट डब्यात गेल्याचं विशाल यांनी सांगितलं. याविषयी आणि शाहरुखच्या ‘जवान’विषयी बोलताना विशाल भारद्वाज म्हणाले, “मला ‘जवान’ प्रचंड आवडला. मी शाहरुखला फोन करून शुभेच्छा दिल्या. आम्ही खूप गप्पा मारल्या. एक काळ असा होता की आम्ही एकत्र एका चित्रपटावर काम सुरू करणार होतो, अगदी त्याची घोषणाही झाली होती व आम्ही चित्रीकरणही सुरू करणार होतो, पण कारणास्तव तो चित्रपट डबाबंद झाला.” याबरोबरच लवकरच किंग खानबरोबर काम करायची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

२०१० मध्ये ‘मिड डे’ने छापलेल्या रीपोर्टनुसार चेतन भगतच्या ‘२ स्टेट्स’ या कादंबरीवर विशाल आणि शाहरुख खान चित्रपट काढणार होते. यानंतर हा चित्रपट सैफ अली खान व प्रियांका चोप्रा करणार असल्याचं स्पष्ट झालं होतं, पण तेदेखील फिस्कटलं अन् नंतर मात्र अभिषेक वर्मनने अर्जुन कपूर व आलिया भट्टला घेऊन तो चित्रपट पूर्ण केला. सध्या शाहरुख ‘टायगर ३’मध्ये छोट्याशा भूमिकेत दिसणार आहे. याबरोबरच पुढच्या वर्षी शाहरुख आणि सलमान ‘टायगर वि. पठाण’चं चित्रीकरण सुरू करणार असल्याची चर्चा आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vishal bhardwaj was about to make movie on chetan bhagat novel with shahrukh khan 13 years ago avn

First published on: 30-09-2023 at 11:38 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×