द काश्मीर फाइल्स’सारखा चित्रपट देणारे विवेक अग्निहोत्री यांचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘द व्हॅक्सिन वॉर’ने पहिल्या दिवशी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. हा चित्रपट करोना महामारी, त्यावेळी देशात असलेली परिस्थिती, देशाने केलेला या भयंकर साथीचा सामना आणि भारतातील लसनिर्मितीची गोष्ट सांगणारा आहे.

‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘द व्हॅक्सिन वॉर’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी फक्त १ कोटी ३० लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. कमी बजेटमध्ये बनलेला ‘द व्हॅक्सिन वॉर’ देशातील १००० स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. गेले काही दिवस या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत होते. परदेशातही त्यांनी याचं खास स्क्रीनिंग आयोजित केलं होतं.

आणखी वाचा : The Vaccine War Review: सत्ताधाऱ्यांचं कोडकौतुक, मीडियावर फोडलेलं खापर; विवेक अग्निहोत्रींचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ कुठे कमी पडला? जाणून घ्या

नुकतंच एका मुलाखतीदरम्यान विवेक यांना त्यांच्या बालपणाबद्दल तसेच त्यांच्या आई वडिलांबद्दल विचारलं असता त्यांनी यावर उत्तर दिलं. ‘अजीत भारती’ या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये विवेक अग्निहोत्री म्हणाले, “मी ग्वालियरचा आहे. माझे आई आणि वडील दोघेही स्वातंत्र्य सैनिक होते. १७ व्या वर्षी माझ्या आईचं लग्न झालं व लगेचच १४ दिवसांतच ती तुरुंगवास भोगण्यासाठी वडिलांबरोबर गेली. वडील आधी दोनवेळा तरुंगांत गेले होते. कोणत्यातरी गांधीजी यांच्या स्कीममुळे सहा महिन्यांनी तुरुंगात ठेवलेल्या साऱ्या महिलांना सोडण्यात आलं.”

पुढे ते म्हणाले, “माझे आई-वडील दोघेही गांधीवादी होते, खादी वापरायचे. जेव्हा इंदिरा गांधींनी आपातकालची घोषणा केली तेव्हा मात्र माझ्या वडिलांनी गांधीवाद पूर्णपणे सोडला. ते दोघेही अत्यंत साध्या पद्धतीने राहायचे. माझे वडील संस्कृतचे प्राध्यापक होते त्यामुळे त्यांनीच मला नाटकांमध्ये भाग घ्यायला लावलं.”

दरम्यान, ‘द व्हॅक्सिन वॉर’ मध्ये नाना पाटेकर यांच्याशिवाय अनुपम खेर, सप्तमी गौडा, पल्लवी जोशी, गिरीजा ओक आणि रायमा सेन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची निर्मिती पल्लवी जोशी यांनी केली आहे.

Story img Loader