‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय आहेत. देशातील तसेच जगातील राजकीय आणि सामाजिक घडामोडी यांच्याबद्दल त्यांना बरीच माहिती असते, शिवाय याबद्दल ते त्यांचे विचार सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतात. नुकतंच विवेक यांनी ख्रिसमसच्या निमित्ताने पॅरिसमधील भयावह परिस्थितीचा व्हिडिओ शेअर केला आहे.

पॅरिसमध्ये सध्या बरंच तीव्र आंदोलन सुरू आहे. फ्रांसची राजधानी असलेल्या पॅरिसमधील कुर्दिश सांस्कृतिक केंद्रावर झालेल्या हल्ल्यात ३ लोकांचा मृत्यू झाल्याने पॅरिसमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. कुर्द नेते आणि इतर काही राजकीय संघटनांनी हा मुद्दा लावून धरून पूर्ण देशात आंदोलन सुरू केलं आहे. काही ठिकाणी या आंदोलनांनी हिंस्त्र वळण घेतलं आहे. पॅरिसची जनतादेखील यात सहभागी झाली आहे.

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी
IIIT Pune
आयआयआयटी पुणेमध्ये प्रवेशाच्या जागांमध्ये टप्प्याटप्प्याने वाढ, डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत उद्या पहिला पदवी प्रदान समारंभ

आणखी वाचा : “हलाल सर्टीफाईड वस्तू…” शरद पोंक्षे यांची भारतवासीयांना कळकळीची विनंती

पॅरिसच्या रस्त्यावर जाळपोळ, दगडफेक, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करतानाचे व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असाच एक व्हिडिओ विवेक यांनी शेअर करत या परिस्थितीवर भाष्य केलं आहे आणि खंतदेखील व्यक्त केली आहे. हा व्हिडिओ शेअर करताना विवेक अग्निहोत्री लिहितात, “मेरी ख्रिसमस पॅरिस, हे सगळं कुणी केलं?” असा सवाल या ट्वीटमधून वीवक अग्निहोत्री यांनी केला आहे.

वामपंथी विचारधारेच्या मंडळींचा यात हात असल्याचं सोशल मीडियावर बोललं जात आहे. विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट केलेल्या या व्हिडिओवरसुद्धा त्यांना ट्रोल केलं जात आहे. एकूणच या व्हिडिओमधील परिस्थिती बघता हे आंदोलन आणखी हिंस्त्र होण्याची शक्यतासुद्धा वर्तवण्यात येत आहे. विवेक अग्निहोत्री सध्या त्याच्या आगामी ‘The Vaccine War’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत.