सलमान खानशी ब्रेकअप झाल्यावर ऐश्वर्या रायचं नाव बॉलीवूडचा चॉकलेट बॉय विवेक ओबेरॉयशी जोडलं गेलं होतं. ऐश्वर्या आणि विवेक काही वर्षे एकमेकांना डेट करत होते. २००४ मध्ये विवेक आणि ऐश्वर्या यांचं ब्रेकअप झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. दोघांचे एकत्र जुने फोटो आजही व्हायरल होत असतात. याशिवाय ऐश्वर्यामुळे सलमान आणि विवेकमध्ये झालेलं भांडण सुद्धा चर्चेचा विषय ठरलं होतं. यानंतर विवेकला बॉलीवूडमधून बॉयकॉट करण्यात आलं होतं. त्याला कुठेही काम मिळत नव्हतं.

आयुष्याच्या खडतर प्रवासात वेळीच सगळं सोडून दुसरा मार्ग निवडला नसता, तर प्रचंड नुकसान झालं असतं असं विवेकने काही महिन्यांपूर्वी डॉ. जय मदानच्या युट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

ऐश्वर्या रायबद्दल विवेक म्हणाला…

ऐश्वर्या रायचा उल्लेख करत विवेकला प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्याने केवळ ३ शब्दांत उत्तर दिलं आहे. तो म्हणाला, ‘God bless Her’…तर पुढे अभिषेक बच्चनचं नाव ऐकताच विवेक म्हणाला, “तो सहृदयी आणि खूपच छान माणूस आहे”

२००४ मध्ये विवेक आणि ऐश्वर्या दोघांचं ब्रेकअप झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. यानंतर अभिनेत्रीने २००७ मध्ये अभिषेक बच्चनशी लग्न केलं आणि ऐश्वर्या अमिताभ व जया बच्चन यांची सून झाली.

विवेकची पत्नीबद्दल प्रतिक्रिया…

यानंतर डॉ. जय मदानने विवेकच्या पत्नीचं म्हणजेच प्रियांका अल्वाचं नाव घेतलं. यावर विवेकने गोड स्माइल करत ‘माय Only Love’ अशी प्रतिक्रिया दिली. वडिलांबद्दल विचारलं असता ‘माय आयडॉल’ असं उत्तर अभिनेत्याने दिलं.

दरम्यान, विवेक अभिनेता आहेच पण, त्याला आघाडीचा व्यावसायिक म्हणून देखील ओळखलं जातं. बॉलीवूडमधून बॉयकॉट केल्यावर विवेकने स्वत:ची स्टार्टअप कंपनी सुरू केली. याबद्दल विवेक सांगतो, “कदाचित त्या गोष्टी घडल्या नसत्या तर मी आता फक्त वरवरचं जीवन जगणारा माणूस झालो असतो. खोटं वागणाऱ्या लोकांमध्ये वावरून त्यांच्यासारखं ‘प्लास्टिक लाइफ’ मी जगलं असतं. पण, आता मला लोकांनी ट्रोल केलं तरी फरक पडणार नाही. कारण, माझ्या जीवनाचं उद्दिष्ट मला माहिती आहे. माझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे याचीही मला जाणीव आहे.” मीडिया रिपोर्ट्सनुसार, विवेकची नेटवर्थ सध्याच्या घडीला १२०० कोटींच्या घरात आहे.