चार वर्षांच्या ब्रेकनंतर एकाच वर्षी सलग ३ ब्लॉकबस्टर चित्रपट देणाऱ्या किंग खान शाहरुख खानने या चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं तेव्हा त्याचा कुणीच गॉडफादर नव्हतं. केवळ जिद्द, मेहनतीच्या जोरावर शाहरुखने आज एवढं मोठं साम्राज्य उभं केलं आहे. जेव्हा शाहरुख मुंबईत अभिनेता बनण्यासाठी आला तेव्हा या शहरात बऱ्याच लोकांनी त्याला मदत केली. या लोकांमध्ये विवेक वासवानी यांचा फार मोठा वाटा होता. अभिनयात करिअर घडवण्यासाठी विवेक यांनीच शाहरुखला मुंबईत यायचा आग्रह केला होता.

विवेक हे शाहरुखचे स्ट्रगलच्या काळापासून असलेले मित्र आहे, परंतु गेल्या चार वर्षांत विवेक यांची शाहरुखशी भेट झालेली नाही, किंबहुना त्यांचं फोनवरही बोलणं झालेलं नाही. यामागे नेमकं कारण काय याबद्दलच विवेक यांनी खुलासा केला आहे. सुरुवातीच्या काळात शाहरुखकडे जेव्हा मुंबईत घर नव्हतं तेव्हा शाहरुख विवेक यांच्याच घरी राहायचा. विवेक यांनी कठीण समयी शाहरुखची पूर्ण मदत केली, पण जेव्हा विवेक स्वतः बऱ्याच संकटांचा सामना करत होते, जेव्हा ते कॅन्सरसारख्या आजाराचा सामना करत होते तेव्हा त्यांनी मात्र शाहरुखसमोर कधीच हात पसरले नाहीत. यूट्यूबर सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये विवेक वासवानी यांनी या गोष्टींवर भाष्य केलं आहे.

arvind kejriwal
अरविंद केजरीवालांचे वजन घटले नाही, तर १ किलो वाढले? भाजपा नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधाण!
vasai crime news, wife s murder accused marathi news
वसई: पत्नीच्या हत्येचा आरोपी पॅरोलवरून फरार, वालीव पोलिसांनी ५ वर्षानंतर केली अटक
Pune, NCP Office bearers, Son, Attacked, Gang, koyata, Dandekar Pool, Six Arrested, crime news, police, politics
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या मुलावर हल्ला; दांडेकर पूल परिसरातील घटना, सहाजणांना अटक
Thane rural police arrested 12 including chandrakant gaware in connection with 5 40 crores robbery
बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याच्या टोळीकडून लूट; ५.४० कोटींच्या लूटप्रकरणी १२ जणांना अटक 

आणखी वाचा : जेव्हा सूरज बडजात्या अभिषेक व करीनावर उखडले; दिग्दर्शकानेच सांगितला किस्सा, म्हणाले “मी माईक फेकला…”

२०१८ च्या शाहरुखच्या वाढदिवसाच्या पार्टीत विवेक त्याला शेवटचं भेटले होते. त्यानंतर आजवर त्यांची भेट झालेली नाही. त्याबद्दल विवेक म्हणाले, “आमचे काही इतके घनिष्ठ संबंध नाहीत, आम्ही काय रोज बोलत नाही, पण जेव्हा भेटतो तेव्हा आम्ही इतके बोलतो की असं वाटेल की आम्ही कालच भेटलो आहोत. मी एक शिक्षक आहे अन् एका शाळेचा मुख्याध्यापक आहे. मी रोज १८ तास काम करतो, मी बस आणि लोकल ट्रेनमधून प्रवास करतो अन् शाहरुख हा एक सुपरस्टार आहे.”

पुढे विवेक म्हणाले, “शाहरुखकडे तब्बल १७ फोन आहेत, माझ्याकडे एकच नंबर आहे. जर तो माझा फोन उचलेल तरच मी त्याच्याशी बोलू शकेन. ‘जवान’नंतर मी त्याला फोन केला होता पण त्याने नाही उचलला. त्यानंतर जेव्हा त्याने फोन केला तेव्हा मी नेमका एका कामात अडकलो होतो ज्यामुळे तो फोन नाही उचलू शकलो. तोसुद्धा कायम फिरतीवर असतो, त्याच्यावरही बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत, एवढा डोलारा सांभाळणं सोप्पं काम नाही.”

विवेक यांनी शाहरुखबरोबर ‘दुल्हा मिल गया’ चित्रपटात काम केलं होतं. आता विवेक यांनी शाहरुखची मुलगी सुहाना खानसह काम करायची इच्छा व्यक्त केली आहे. सुहानाला घेऊन एखादा चित्रपट दिग्दर्शित किंवा निर्मिती करायची इच्छा विवेक यांनी व्यक्त केली.