'फिर आयी हसीन दिलरुबा' (Fir Aayi Haseen Dilruba) या चित्रपटाची मोठी चर्चा रंगली आहे. चित्रपटाची कथा, दिग्दर्शन आणि याबरोबरच कलाकारांचे अभिनय या सगळ्याची चर्चा रंगताना दिसत आहे. आता या सगळ्यात अभिनेता सनी कौशल लक्ष वेधून घेतले आहे. सनी कौशलने आपल्या अभिनयाने सर्वांना अचंबित केल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. आता कतरिना कैफने सोशल मीडियावर सनीच्या अभिनयाचे कौतुक करणारी पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री कतरिना कैफने 'फिर आयी हसीन दिलरुबा' चित्रपटातील एका सीनचा फोटो शेअर करत लिहिले, "चित्रपट पाहताना खूप मजा आली, हा चित्रपट खूप आवडला. चित्रपट पाहताना माझ्या पतीला कथानाबद्दलच्या कल्पना सांगण्यासाठी काही वेळा चित्रपट पॉज केला." कतरिना कैफ आणि शरवरी वाघ यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीज विक्रांत मेस्सी, तापसी पन्नू, जिमी शेरगिल यांना आणि चित्रपटातील इतर कलाकारांना टॅग करत तिने कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. सगळ्यात शेवटी तिने आपल्या दीराला म्हणजेच अभिनेता सनी कौशलला टॅग करत लिहिले की, तु मला आश्चर्याचा धक्का दिला आहेस. तुझी ही बाजू बघितल्यानंतर तू जे काही बोलशील ते बरोबर आहे, तु कायम बरोबरच आहे आणि सर्वोत्तम दीर आहेस. मी कधीही तुला त्रास देणार नाही, हे माझं वचन आहे." याआधी विकी कौशलने कतरिनाने शेअर केलेला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत, परत एकदा चित्रपट बघतोय, असे लिहिले होते. हेही वाचा: Video: लीला संकटात असताना एजे मदतीला धावून येणार! विक्रांतचा खरा चेहरा.., ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित याबरोबरच, अभिनेत्री शरवरीनेदेखील चित्रपटाचे आणि कलाकारांचे कौतुक करत लिहिले, चित्रपट पाहताना मी माझ्या सोफ्याच्या काठाला होते असे म्हणत फिर आयी हसीन दिलरुबा पाहणे रोमांचकारी होते. तापसी पन्नू आणि विक्रांत मेस्सी यांना टॅग करत त्यांचे कौतुक केले तर सनी कौशलला अविश्वसनीय कामगिरी केल्याचे म्हटले आहे. संपूर्ण टीमचे तिने अभिनंदनही केले आहे. 'फिर आयी हसीन दिलरुबा' हा चित्रपट 'हसीन दिलरुबा' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात विक्रांत मेस्सी आणि तापसी पन्नू हे मुख्य भूमिकेत असून सनी कौशलने अभिमन्यूच्या पात्रात प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. फिर आयी हसीन दिलरुबा या चित्रपटात तो तापसी पन्नूने निभावलेल्या राणी या पात्राचा प्रियकराच्या भूमिकेत आहे. जिमी शेरगिल हे पोलिसाच्या भूमिकेत दिसून आले आहेत.