Akshay Kumar prank with Rajpal Yadav: अक्षय कुमार लवकरच ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अक्षय कुमारसह दिशा पाटनी, जॅकलीन फर्नांडिस, अनिल कपूर, रवीना टंडन, जॉनी लिव्हर, अर्शद वारसी, परेश रावल, राजपाल यादव, संजय दत्त, सुनील शेट्टी, लारा दत्ता, बॉबी देओल, श्रेयस तळपदे, कृष्णा अभिषेक हे आणि असे अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाच्या संबंधित अनेक गोष्टी सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

आता अक्षय कुमारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ‘वेलकम टू द जंगल’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा आहे. अभिनेत्याने स्वत: हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

‘वेलकम टू द जंगल’च्या सेटवर नेमकं घडलं काय?

या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, कलाकार सेटवर आहेत. राजपाल यादव कोणाशीतरी बोलत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच्या मागून अक्षय कुमार येतो, त्याने घोड्याचा लगाम धरला आहे. तो त्या घोड्याला राजपाल यादवच्या जवळ नेतो, त्यावेळी घोडा राजपाल यादवच्या केसाजवळ रवंथ करत असल्याचे दिसते. मात्र, राजपालला याची कल्पना नसल्याने तो घाबरतो आणि ओरडतो. मागे वळून पाहिल्यानंतर घोड्याचे तोंड त्याच्या डोक्याजवळ असल्याचे दिसते. त्यानंतर तो हसायला लागतो. राजपाल यादव घाबरून ओरडल्यानंतर अक्षय कुमार व तिथेच उभे असलेले परेश रावलही हसत असल्याचे पाहायला मिळतात.

अक्षय कुमारने हा व्हिडीओ शेअर करताना चित्रपटाबद्दल लिहिले की, ‘वेलकम टू द जंगल’ची तुम्ही जितकी कल्पना केली असेल त्यापेक्षाही त्यात धमाल आहे. हा सिनेमा २६ जून २०२६ ला प्रदर्शित होणार आहे.

नेटकरी म्हणाले…

आता अक्षय कुमारच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत, तर अनेकांनी हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. एकाने लिहिले, “हे तिघे एकत्र आले आहेत, तर कदाचित नवीन काहीतरी बघायला मिळेल”, दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, “सगळ्यांना एकत्र पाहून खूप छान वाटलं”, एकाने लिहिले, “राजू मोड ऑन”, आणखी एकाने लिहिले, “अक्षय सर, मला तुमचा अभिनय खूप आवडतो. विनोदी भूमिका सर्वात जास्त आवडतात”, एकाने लिहिले, “बरे झाले, राजपालचे केस ओढले नाहीत”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

याआधी ‘वेलकम’, ‘वेलकम बॅक’ या सिनेमांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. हे दोन्ही सिनेमे प्रचंड गाजले होते. आता त्याप्रमाणेच हा सिनेमाही गाजणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, ‘हेरा फेरी ३’मधून परेश रावल बाहेर पडल्याचे रिपोर्ट्स समोर आले होते. आता या सिनेमाबद्दल, कलाकारांच्या कास्टिंगबद्दल कधी खुलासा करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे