बॉलीवूडची बेबो नेहमी चर्चेत असते. अभिनय, सौंदर्या व्यतिरिक्त तिच्या हावभावाचे वेगळे चाहते आहेत. करीनाच्या वेगवेगळ्या हावभावाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात अजून एका व्हिडीओची भर पडली आहे. एका पुरस्कार सोहळ्यामधील करीना कपूरच्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

करीना कपूर आणि अभिषेक बच्चन यांनी बॉलीवूडमध्ये करिअरची एकत्र सुरुवात केली होती. २०००मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रिफ्यूजी’ चित्रपटाच्या माध्यमातून करीना आणि अभिषेकने झगमगत्या दुनियेत पाऊल ठेवलं. त्यानंतर बऱ्याच चित्रपटात दोघं एकत्र पाहायला मिळाले. पण गेल्या काही वर्षांपासून करीना आणि अभिषेकने एकत्र काम केलं नाही. नुकत्याच झालेल्या फिल्म फेअर ओटीटी पुरस्कार सोहळ्यात दोघं एकत्र पाहायला मिळाले. याच पुरस्कार सोहळ्यातील करीना आणि अभिषेकचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”

हेही वाचा – “जितकं आपण या अभिनेत्रीला…”, चिन्मय मांडलेकरने निवेदिता सराफांचं भरभरून कौतुक करत केली खंत व्यक्त, म्हणाला…

फिल्म फेअरच्या ओटीटी पुरस्कार सोहळ्यात करीनला ‘जाने जा’ या चित्रपटातील कामासाठी गौरविण्यात आलं. यावेळी अभिषेक बच्चनने तिला पुरस्कार प्रदान केला. यावेळी करीनाने खूप सुंदर साडी नेसली होती. याच पुरस्कार सोहळ्यात अभिषेकने करीनाला गळाभेट करून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर तो विजय वर्माला शुभेच्छा देण्यासाठी पुढे गेला. तेव्हा करीराने डोळे फिरवले. तिच्या या हावभावाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – Video: दुआ लिपा लाइव्ह कॉन्सर्टमध्ये शाहरुख खानच्या गाण्यावर का थिरकली? कारण सांगत म्हणाली…

करीना कपूरच्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ज्युनिअर बच्चनला भेटून बेबोला आनंद झाला नाही, त्यामुळे ती चिडचिड करताना दिसत आहे, अशी नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. करीना आणि अभिषेकचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे.

हेही वाचा – Video: आळंदीचा चैतन्य देवढे गाजवतोय ‘इंडियन आयडल’चं १५वं पर्व, नाना पाटेकरांनी त्याची ‘ही’ कृती पाहून जोडले हात, पाहा व्हिडीओ

दरम्यान, करीना कपूरने ‘जाने जा’ चित्रपटातून ओटीटीवर पदार्पण केलं. नेटफ्लिक्सवर तिचा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात करीनाबरोबर अभिनेता जयदीप अहलावत आणि विजय वर्मा झळकला होता. जपानी लेखक केइगो हिगाशिनो (keigo higashino) यांची सर्वाधिक विकलेली थ्रिलर कादंबरी ‘डिवोशन ऑफ सस्पेक्ट एक्स’ (The Devotion of Suspect X) यावर ‘जाने जा’ चित्रपट आधारित आहे. या चित्रपटातून करीना एका वेगळ्या रुपातून दिसली असून तिने आईची भूमिका साकारली आहे.

Story img Loader