९० च्या दशकातील सुपरहिट चित्रपट ‘हम आपके है कौन’ अनेकांचा आवडता सिनेमा आहे. या मल्टीस्टारर चित्रपटात अनेक आघाडीच्या कलाकारांनी काम केलं होतं. या चित्रपटातील गाणी अजुनही लोकांच्या मनात घर करून आहेत. आजही जेव्हा हा चित्रपट टीव्हीवर प्रसारित होतो तेव्हा लोक मोठ्या उत्सुकतेने पाहतात. यामध्ये सलमान खान, रेणुका शहाणे, मोहनीश बहल, माधुरी दीक्षित, लक्ष्मीकांत बेर्डे आणि हिमानी शिवपुरी यांसारखे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. या चित्रपटाच्या शूटिंगवेळी सर्वांसमोर एका अभिनेत्रीने सलमान खानला कानशिलात लगावली होती. हा किस्सा जाणून घेऊयात. 'हम आपके है कौन' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खानला सार्वजनिक ठिकाणी कानशिलात मारण्यात आली होती. त्याला चित्रपटातील सह-अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी मारलं होतं. यासंदर्भातील किस्साही त्यांनी सांगितला. या चित्रपटात हिमानी यांनी डॉ. रझियाची भूमिका केली होती. यामध्ये त्या शक्ती कपूरच्या पत्नीच्या भूमिकेत होत्या. सलमान खान चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान खूप गंमत करत असे असं त्यांनी सांगितलं. सेलिब्रिटी जोडप्याने मुंबईत घेतलं घर, आलिशान अपार्टमेंटसाठी मोजले १९ कोटी रुपये हिमानी म्हणाल्या, "माझा सलमान खानबरोबर एक सीन होता. यामध्ये तो मला चाची जान म्हणतो. हा सीन कसा करायचा हे सूरज बडजात्या यांनी दोघांनाही समजावून सांगितलं होतं. पण, सीन शूट करताना सलमान खान मला 'चाची जान' म्हणाला आणि त्याने अचानक मला उचलून घेतलं. यामुळे मला धक्का बसला. त्यानंतर मी त्याला कानाखाली मारली. आता हे पाहून सेटवर उपस्थित सर्वजण आश्चर्यचकित झाले. खुद्द सूरज बडजात्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. पण हा सीन चांगला वाटतोय आणि तो चित्रपटात ठेवणार असं त्यांनी सांगितलं." “आम्ही कोणाच्या पोटी जन्मलो?” सरोगसीद्वारे जन्मलेली जुळी मुलं विचारतात प्रश्न; करण जोहर म्हणाला, “ही परिस्थिती…” हिमानी व सलमान यांनी या चित्रपटांमध्ये केलं एकत्र काम सलमान खान त्यावेळी खूप खोडकर होता. पण त्याच्याबरोबर काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता. संपूर्ण कलाकार आणि क्रूसाठी सलमान त्याच्या घरून बिर्याणी आणत असे, असं हिमानी यांनी सांगितलं. सलमान खान व हिमानी यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. यामध्ये ‘हम साथ साथ हैं’, ‘बीवी नंबर १’, ‘दुल्हन हम ले जाएंगे’ आणि ‘जब प्यार किसी से होता है’ सारख्या चित्रपटांमध्ये या दोघांनी स्क्रीन शेअर केल्या आहेत. गरोदर असल्याने सोनाक्षी सिन्हाने केलं लग्न? अभिनेत्री प्रतिक्रिया देत म्हणाली, “आता बदल एवढाच…” दरम्यान, सलमान खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. तो 'सिकंदर'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुरुगदास करत असून दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना यात महत्त्वपूर्ण भूमिकेत असेल. २०२५ ला ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होईल.