बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री ऐश्वर्या राय सध्या चर्चेत आहे. मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसली आहे. हा चित्रपट दक्षिण भारतातील चोल साम्राज्यवर बेतलेला आहे. दिग्दर्शक मणिरत्नम कायमच वेगळ्या धाटणीचे चित्रपट आपल्या भेटीस घेऊन येत असतात. ‘बॉम्बे’, ‘रोजा’ ‘दिल से या’ चित्रपटात संवेदनशील विषय त्यांनी उत्तमरीत्या मांडले होते. अभिनेत्री ऐश्वर्या रायनेदेखील आपल्या अभिनयाचा श्रीगणेशा मणिरत्नम यांच्या चित्रपटातून केला होता. चक्क या चित्रपटासाठी तिने बॉलिवूडचे चित्रपट नाकारले होते.

ऐश्वर्या रायने मागे फेमिना मासिकाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या पदार्पणाबद्दल सांगितले होते की, ‘दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांनी मला ‘राजा हिंदुस्थानी’ या चित्रपटासाठी विचारले होते तर यश चोप्रा यांनी मला ‘दिल तो पागल हैं’ चित्रपटासाठी विचारले होते. त्याचदरम्यान मला मणिरत्नम यांच्या ‘इरुवर’ चित्रपटासाठी विचारण्यात आले. मणिरत्नम यांच्या चित्रपटाची मी आधीपासून चाहती होते. त्यामुळे हा चित्रपट मी केला. नवोदित कलाकरांना चित्रपटात काम करण्यासाठी बराच काळ वाट बघावी लागते मात्र माझ्याकडे आधीच पदार्पणात २,३ चित्रपट होते’.

Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य
Child beaten teacher pune, pune,
पुणे : शिक्षिकेकडून मुलाला बेदम मारहाण; समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

अक्षयच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, रक्षाबंधन आता ‘ओटीटीवर’ होणार प्रदर्शित!

इरुवर हा चित्रपट हा चित्रपट कल्की कृष्णमूर्तीच्या कादंबरीवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नावाजलेले कलाकार होते. तब्बू, प्रकाश राज, मोहनलाल यांच्या दमदार अभिनयाने चित्रपट गाजला होता. या चित्रपटाचे लेखन मणिरत्नम एलांगो कुमारवेल आणि बी. जयमोहन यांनी केले होते. तर मद्रास टॉकीज आणि लायका प्रॉडक्शन या संस्थांनी चित्रपटाची निर्मिती केली होती.

ऐश्वर्या रायने ‘और प्यार हो गया या’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. आपल्या करियरची सुरवात तिने मॉडेलिंग क्षेत्रापासून केली. त्यानंतर तिने काही जाहिरातींमध्ये काम केले. ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘धूम २’ हे तिचे गाजलेले चित्रपट. मणिरत्नम यांनी गुरु चित्रपटातदेखील ऐश्वर्या रायला एक उत्तम भूमिका दिली होती. चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटात तिचा नायक अभिषेक बच्चन होता ज्याच्यासोबत तिने आपली लग्नगाठ बांधली. सध्या तिचा ‘पोन्नियिन सेल्वन’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतो आहे.