Amitabh Bachchan on Rekha: अमिताभ बच्चन यांनी १९६९ ला प्रदर्शित झालेल्या सात हिंदूस्तानी या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. १९७३ ला प्रदर्शित झालेल्या जंजीर चित्रपटातून त्यांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. अमिताभ बच्चन आजही विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. ते सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. बिग बी त्यांच्या ब्लॉगमध्ये त्यांचे अनुभव सांगतात. विविध चित्रपटांच्या सेटवरील ते किस्से सांगतात. अनेकदा त्यांची जुनी वक्तव्येदेखील चर्चेत असतात.
अमिताभ बच्चन व रेखा हे रिलेशनशिपमध्ये होते, अशा चर्चा आजही होताना दिसतात. त्यांनी अनेक सिनेमांत एकत्र काम केले आहे. सिनेमांतील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. त्यानंतर ते रिलेशनमध्ये असल्याचे म्हटले जात होते. यावर एकदा अमिताभ बच्चन यांनी वक्तव्य केले होते.
अमिताभ बच्चन रेखा यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल म्हणालेले…
अमिताभ बच्चन यांनी सिमी गरेवालला दिलेल्या एका मुलाखतीत रेखा यांच्याबरोबर कसे नाते आहे, यावर वक्तव्य केले होते. ते म्हणालेले, “ती माझी सह कलाकार होती आणि माझी सहकारी होती. सहाजिकच जेव्हा आम्ही एकत्र काम करत होतो, तेव्हा आम्हाला एकमेकांना भेटावे लागे, आमची भेट होत असे. इतर पुरस्कार सोहळे आणि कार्यक्रमादरम्यानही आमची भेट होत असे, पण ते तेवढ्यापुरतेच मर्यादित होते”, असे म्हणत अमिताभ बच्चन यांनी रेखा यांच्याबरोबर ते रिलेशनशिपमध्ये नव्हते, ते त्यांच्या प्रेमात नव्हते, असे स्पष्ट केले होते.
अमिताभ बच्चन यांनी वारंवार रेखा यांच्याबरोबरच्या रिलेशनशिपच्या अफवा फेटाळून लावल्या असल्या तरी आजही त्यांच्या नात्याबद्दल वेळोवेळी चर्चा होताना दिसते. असेही म्हटले जाते की, सिलसिला या सिनेमात रेखा, अमिताभ बच्चन व जया बच्चन यांच्या खऱ्या आयुष्याचे पडसाद पाहायला मिळतात. या सिनेमात हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. या तीन लोकप्रिय कलाकारांनी एकत्र काम केलेला हा तिसरा सिनेमा होता. १९८१ ला सिलसिला हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.
जया व अमिताभ बच्चन यांनी ३ जून १९७३ ला लग्नगाठ बांधली. त्यांना श्वेता व अभिषेक ही दोन मुले आहेत. अभिषेक हा आई-वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात काम करत आहे. अलीकडे अभिषेकच्या अनेक सिनेमांचे, त्यांच्या भूमिकांचे कौतुक झाले आहे. नुकताच तो राजा शिवाजी सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसला. ही भूमिका पाहिल्यानंतर अनेकांनी त्याचे कौतुक केले होते. आता तो लवकरच शाहरुख खानबरोबर किंग सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमातील त्याचा लूक व्हायरल झाला होता.
दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचे तर ते लवकरच कल्की २ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
