बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रेखा (Rekha) प्रेमात होते की नाही हा आजही चाहत्यांच्या चर्चेचा विषय आहे. काहींनी त्यांचं अफेअर नव्हतं, अफवा होत्या असं म्हटलं. तर काही लोक म्हणतात की ते खरंच प्रेमात होते. रेखा यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम असल्याचं म्हटलं होतं, पण अमिताभ बच्चन मात्र याबद्दल बोलणं टाळायचे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री सिमी गरेवालने रेखा तसेच अमिताभ बच्चन व जया यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. रेडिफला दिलेल्या मुलाखतीत सिमीने १९९८ मध्ये अमिताभ बच्चन यांची मुलाखत घेतली होती, तेव्हाची आठवण सांगितली. तेव्हा बच्चन यांचे चित्रपट फार चालत नव्हते आणि त्यांची निर्मिती कंपनी अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेडची (ABCL) परिस्थिती फार चांगली नसल्याने ते संघर्ष करत होते. त्यावेळी बिग बींचा आत्मविश्वास डगमगला होता, असं सिमीने सांगितलं. या मुलाखतीसाठी खूप तयारी केली होती, मुलाखतीआधी एकदा त्यांची भेट घेतली होती, असं सिमी म्हणाली. “मी त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले, ‘अमितजी, तुम्ही या मुलाखतीत १०० टक्के द्यावे आणि प्रामाणिक राहावं असं मला वाटतं. त्यावर ते म्हणाले ‘मी १०० टक्के देईन, मी जसा आहे तसाच मुलाखतीत असेन,” अशी आठवण सिमीने सांगितली.

अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम आहे का? मुलाखतीत थेट विचारलेल्या प्रश्नावर रेखा म्हणाल्या होत्या…

अमिताभ बच्चन यांची मुलाखत

“आम्ही खूप गोष्टींबद्दल बोललो. त्यांचे बालपण, आई-वडील, एबीसीएल कंपनी, त्यांचे फ्लॉप चित्रपट, त्यांचे पुनरागमन, त्यांचे कुटुंब, जया, मुलं, त्यांना आवडणाऱ्या महिला, त्यांचे व्यावसायिक निर्णय या सर्व गोष्टींबद्दल बोललो. त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे उत्तरं दिली असं मला वाटतं. बरेच लोक त्या मुलाखतीनंतर म्हटले की ‘अमिताभ बच्चन तसे नाहीत!’ किंवा ‘ते रेखाबद्दल खरं बोलत नव्हते!’ पण मला विश्वास आहे की त्या मुलाखतीत ते जे बोलले ते खरं होतं. पण लोक त्याच गोष्टीवर विश्वास ठेवतात ज्यावर त्यांना ठेवायचा आहे,” असं सिमी म्हणाली.

अमिताभ, जया व रेखा लाँग ड्राइव्हवर जायचे एकत्र; ‘ते’ दोघेही पुढच्या सीटवर बसायचे अन् मागे…

रेखाबद्दल काय म्हणाले होते अमिताभ बच्चन?

रेखाबरोबरच्या नात्याबद्दल विचारलं असता अमिताभ बच्चन सिमी गरेवालला म्हणाले होते, “ती माझी सहकलाकार आणि सहकारी आहे. आणि जेव्हा आम्ही एकत्र काम करत होतो, तेव्हा साहजिकच आम्ही एकमेकांना भेटलो होतो. आमच्यात काहीच साम्य नाही. काहीवेळा आपण एखाद्या कार्यक्रमात, म्हणजे एखाद्या पुरस्कार सोहळ्यात वगैरे भेटतो तेवढंच.” यासंदर्भात न्यूज १८ ने वृत्त दिलंय.

जया बच्चन यांना ‘या’ नावाने हाक मारायच्या रेखा; एकाच इमारतीत राहायच्या दोघी, अमिताभ अन् रेखांची पहिली भेट…

रेखा काय म्हणाल्या होत्या?

‘Rendevouz with Simi Garewal’ या खास चॅट शोमध्ये सिमी यांनी रेखा यांना थेट अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम आहे का? असा प्रश्न केला होता. त्यावर रेखा म्हणाल्या होत्या, “अर्थात, आजपर्यंत मला एकही पुरुष, स्त्री, लहान मूल किंवा वृद्ध माणूस सापडला नाही जो त्यांच्यावर वेड्यासारखं प्रेम करत नाही, मग माझं प्रेम कसं नसेल?” त्यावेळी सिमी असं रेखा यांना थेट कसं विचारू शकतात? अशी टीकाही झाली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When amitabh bachchan reacted on his relationship with rekha simi garewal show hrc
Show comments