Chetak Screen Awards 2026 Live Streaming: ‘द इंडियन एक्सप्रेस ग्रुप’द्वारे सुरू करण्यात आलेले ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स’ आता अनेक वर्षांनी परत पाहता येणार आहेत. या पुरस्कारांचा मुख्य उद्देश विश्वासार्हता जपून फक्त गुणवत्ता आणि कौशल्याच्या जोरावर चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कलाकारांचा सन्मान करणे हा आहे. ५ एप्रिल रोजी मुंबईत हा सोहळा पार पडणार आहे. बॉलीवूडमधील दिग्गज कलाकार एकाच छताखाली एकत्र येऊन चित्रपटसृष्टीतील खऱ्या गुणवत्तेचा गौरव करतील.

चेतक स्क्रीन अवॉर्ड्स सोहळा ५ एप्रिल रोजी मुंबईत पार पडणार आहे. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण युट्यूब आणि सोनी लिव्हवर केले जाईल. तसेच, रात्री ८ वाजल्यापासून सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरही प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहता येईल.

चेतक स्क्रीन अवॉर्ड्सचे होस्ट कोण आहेत?

‘गंगूबाई काठियावाडी’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’, ‘हायवे’ आणि ‘उडता पंजाब’ सारख्या चित्रपटांतील दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री आलिया भट्ट हा सोहळा होस्ट करणार आहे. तिला साथ देण्यासाठी अभिनेता-कॉमेडियन सुनील ग्रोव्हर आणि स्टँड-अप कॉमेडियन झाकीर खान उपस्थित राहतील. तसेच ‘द इंडियन एक्सप्रेस’चे हिंदी संपादक सौरभ द्विवेदी हे देखील या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसतील.

Award Banner

यावर्षी, चेतक स्क्रीन अवॉर्ड्समध्ये एकूण ३१ कॅटेगरीमधील कलाकारांचा गौरव केला जाईल. यात चित्रपटगृहात प्रदर्शित झालेले चित्रपट आणि ओटीटीवरील चित्रपट अशा दोन्ही माध्यमांचा समावेश आहे. या सोहळ्यात फक्त अभिनेत्यांचाच नव्हे, तर चित्रपट निर्मितीत मोलाचे योगदान देणाऱ्या तंत्रज्ञांचाही सन्मान केला जाईल.

कोणते चित्रपट पुरस्कारांच्या शर्यतीत आघाडीवर आहेत?

आदित्य धर यांचा हा स्पाय-थ्रिलर चित्रपट २४ नामांकनांसह आघाडीवर आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही प्रचंड यश मिळवले आहे. मोहित सुरीचा सैयारा हा रोमँटिक म्युझिकल चित्रपट १७ नामांकनांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. नीरज घायवान दिग्दर्शित होमबाउंड १५ नामांकनांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

विजेत्यांची निवड कशी केली जाते?

विजेत्यांची निवड ‘स्क्रीन अकॅडमी’द्वारे केली जाईल. ही एक स्वतंत्र आणि नॉन प्रॉफिट संस्था असून, यामध्ये ५० हून अधिक नामांकित चित्रपट निर्माते, कलाकार आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश आहे. विजेते निवडताना पारदर्शकता आणि निष्पक्षता राहावी, यासाठी एक विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा लॉस एंजेलिसमधील ‘युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया’ येथील सिनेमा आणि मीडिया स्टडीजच्या प्राध्यापिका डॉ. प्रिया जयकुमार यांनी तयार केला आहे.

स्क्रीन अकॅडमीचे सदस्य कोण आहेत?

१. अभिषेक चौबे – दिग्दर्शक आणि पटकथा लेखक
२. अमित रे – प्रोडक्शन डिझायनर
३. अमृतपाल सिंग बिंद्रा – चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक
४. आनंद महिंद्रा – कला संरक्षक, महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष
५. अनिल मेहता – सिनेमॅटोग्राफर
६. अतुल मोंगिया – कास्टिंग डायरेक्टर, अभिनय मार्गदर्शक
७. बिश्वदीप चटर्जी – साऊंड डिझायनर
८. दीपा भाटिया – चित्रपट संपादक, लेखक
९. दीपा मेहता – दिग्दर्शिका आणि लेखिका
१०. फिरोज अब्बास खान – दिग्दर्शक आणि पटकथा लेखक
११. गौरव गांधी – प्रमुख, अमेझॉन प्राइम व्हिडिओ (APAC)
१२. गौतम घोष – दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर
१३. गुनीत मोंगा कपूर – चित्रपट निर्माती
१४. जयदीप साहनी – पटकथा लेखक आणि गीतकार
१५. जॉन अब्राहम – अभिनेता आणि निर्माता
१६. कबीर खान – दिग्दर्शक
१७. करण जोहर – दिग्दर्शक, निर्माता, टॉक शो होस्ट
१८. कौसर मुनीर – गीतकार आणि पटकथा लेखक
१९. मनीष मल्होत्रा – फॅशन डिझायनर आणि निर्माता
२०. मनोहर वर्मा – ॲक्शन डायरेक्टर
२१. मॅक्सिमा बासू – कॉस्च्युम आणि फॅशन डिझायनर
२२. मुकेश छाबरा – कास्टिंग डायरेक्टर
२३. नागेश कुकुनूर – दिग्दर्शक आणि पटकथा लेखक
२४. नमित मल्होत्रा – चित्रपट निर्माता, DNEG चे जागतिक CEO
२५. नम्रता राव – दिग्दर्शिका आणि निर्माती
२६. निहारिका भसीन – कॉस्च्युम डिझायनर
२७. पायल कपाडिया – दिग्दर्शिका
२८. पूजा लढा सुरती – चित्रपट संपादक आणि लेखिका
२९. प्रीतम चक्रवर्ती – संगीत दिग्दर्शक आणि संगीतकार
३०. प्रसेनजीत चॅटर्जी – अभिनेता आणि निर्माता
३१. आर. एस. प्रसन्ना – दिग्दर्शक
३२. राहुल ढोलकिया – दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक
३३. राजीव मेनन – सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक
३४. राजकुमार हिराणी – चित्रपट संपादक, पटकथा लेखक आणि दिग्दर्शक
३५. राम माधवानी – दिग्दर्शक
३६. रमेश तौरानी – चित्रपट आणि संगीत निर्माता
३७. रवी चंद्रन – सिनेमॅटोग्राफर
३८. रसूल पुकुट्टी – साऊंड डिझायनर आणि निर्माता
३९. रिमा दास – लेखिका, दिग्दर्शिका आणि संपादक
४०. रॉनी स्क्रूवाला – चित्रपट निर्माता आणि उद्योजक
४१. साबू सिरिल – प्रोडक्शन डिझायनर
४२. समीर नायर – व्यवस्थापकीय संचालक, अप्लॉज एंटरटेनमेंट
४३. श्यामक दावर – कोरिओग्राफर
४४. शुजित सरकार – दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता
४५. सिद्धार्थ रॉय कपूर – चित्रपट निर्माता
४६. श्रीराम राघवन – दिग्दर्शक आणि पटकथा लेखक
४७. सुभाष घई – दिग्दर्शक, निर्माता आणि शिक्षणतज्ज्ञ
४८. सुब्रत चक्रवर्ती – प्रोडक्शन डिझायनर
४९. सुजॉय घोष – पटकथा लेखक आणि दिग्दर्शक
५०. स्वप्नील सोनावणे – सिनेमॅटोग्राफर आणि निर्माता
५१. तनुज गर्ग – चित्रपट निर्माता
५२. विद्या बालन – अभिनेत्री
५३. विनय कुमार – अभिनेता, दिग्दर्शक आणि नाट्य संशोधक