बॉलीवूड दिग्दर्शक व अभिनेता अनुराग कश्यप त्याच्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. अनुरागचं दिग्दर्शन असलेला पहिलाच चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. ‘ब्लॅक फ्रायडे’ (Black Friday) असं या चित्रपटाचं नाव. २००४ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवसाआधी त्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर सरकार चित्रपटाच्या प्रिंट्स जाळून टाकेल, या भीतीने त्याने चित्रपटाच्या काही डीव्हीडी परदेशात नेऊन फुकट वाटल्या होत्या, असा खुलासा केला आहे.

मॅराकेच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनुरागने त्याच्या करिअरबद्दल सांगितलं. तसेच ‘ब्लॅक फ्रायडे’ चित्रपटाची प्रिंट देशाबाहेर का नेली होती, याबाबत त्याने माहिती दिली. हा चित्रपट लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये पाठवण्यात आला होता, पण शेवटच्या क्षणी त्याच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती. एका थिएटर मालकाने बेकायदेशीरपणे चित्रपटाच्या प्रिंट्स विकल्या आणि मग तो सिनेमा डीव्हीडीवर पायरेटेड झाला. त्यानंतर अनुरागने स्वतः अशा शेकडो डीव्हीडी विकत घेऊन त्या परदेशात फुकट वाटल्या होत्या. याच माध्यमातून हा चित्रपट ‘स्लमडॉग मिलेनियर’चा दिग्दर्शक डॅनी बॉयलपर्यंत पोहोचला होता.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

अरबाज पटेलच्या मनात निक्कीसाठी भावना, त्याच्या गर्लफ्रेंडने घेतला मोठा निर्णय; म्हणाली, “आता स्वतःची…”

मी घाबरलो होतो – अनुराग कश्यप

अनुराग म्हणाला, “सेन्सॉर बोर्डाने माझ्या पहिल्या चित्रपटावर बंदी घातल्यावर मी ऑफिसमध्ये गेलो. त्यावेळी मी लहान होतो. सेन्सॉर बोर्डाचे प्रमुख म्हणाले, ‘तुझ्यासाठी सिनेमा म्हणजे काय? ‘सिनेमा म्हणजे सकारात्मक प्रभाव पाडणारा व मनोरंजन करणारा. तुझा चित्रपट सकारात्मक प्रभाव पाडत नाही किंवा मनोरंजनही करत नाही.’ लहान असल्याने मी त्यावेळी खूप गोंधळलो होतो. माझा एक मित्र प्रिन्स्टनमध्ये इतिहासाचा प्राध्यापक होता. मी चित्रपटाची एक प्रिंट त्याच्याकडे ठेवायला दिली, कारण मला भीती होती की सरकार ती प्रिंट जाळून टाकणार. भारतात, ७० च्या दशकात सरकारने ‘किस्सा कुर्सी का’ नावाच्या चित्रपटाच्या प्रिंट खरंच जाळल्या होत्या. मी खूप घाबरलो होतो, त्यामुळे मी एक प्रिंट प्रिन्स्टनमध्ये ठेवायला घेतली.”

‘या’ दिग्गज अभिनेत्याने मांसाहारासाठी भाड्याने घेतलेलं घर, सचिन पिळगांवकर यांचा खुलासा; म्हणाले, “त्यांचे कुटुंबीय…”

…अन् चित्रपट दोन महत्त्वाच्या लोकांपर्यत पोहोचला

प्रदर्शनाच्या एक दिवस आधी या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती, त्यामुळे चित्रपटगृहांमध्ये प्रिंट आधीच पाठवण्यात आल्या होत्या. “काही थिएटर मालकांनी हा चित्रपट पायरेट्सना विकला, त्यामुळे चित्रपट पायरेटेड झाला. मी माझ्या स्वतःच्या चित्रपटाच्या पायरेटेड डीव्हीडीच्या २०० कॉपी विकत घेतल्या, अमेरिकेला गेलो आणि त्या डीव्हीडी व्हिडीओ स्टोअरमध्ये दिल्या. तिथून तो चित्रपट डॅनी बॉयल आणि भारताचे सरन्यायाधीश या दोन अत्यंत महत्त्वाच्या लोकांपर्यंत पोहोचला,” असं अनुराग म्हणाला.

“…अन् आमिर खडकामागे जाऊन रडू लागला”; ट्विंकल खन्नाने सांगितला किस्सा, म्हणाली, “मी अक्षयबद्दल…”

बॉयलने २००८ मध्ये ‘ब्लॅक फ्रायडे’ हा चित्रपट प्रेरणादायी असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर याकडे भारताच्या सरन्यायाधीशांचे लक्ष वेधले गेले, त्यांनी हा चित्रपट प्रदर्शित व्हायलाच हवा, असा मुद्दा उचलून धरला आणि त्यानंतर हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता.

Story img Loader