‘निवडुंग’ या मराठी चित्रपटात रवींद्र मंकणी यांच्यासह झळकणारी अभिनेत्री अर्चना जोगळेकर आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. ९० च्या दशकात अर्चना जोगळेकर हे नाव बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींमध्ये घेतले जायचे. लाजवाब अभिनय आणि नृत्य कौशल्य यासाठी अर्चना प्रसिद्ध होती. पण त्यानंतर मात्र या अभिनेत्रीच्या कारकिर्दीत अशी एक घटना घडली ज्यामुळे तिने चित्रपटातून कायमचा ब्रेक घेतलाच पण ती आपल्या देशापासूनही दुरावली.

अर्चनाने चित्रपटांबरोबरच टीव्ही इंडस्ट्रीतही चांगले नाव कमावले. अभिनेत्रीने तिच्या करिअरमध्ये ‘किस्सा शांती का’, ‘कर्णभूमी’ आणि ‘फूलवती’ सारख्या प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये काम केले होते. शिवाय तिने प्रादेशिक चित्रपटांमध्येही आपला दबदबा निर्माण केला होता. एके दिवशी उडिया भाषेतील एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एक भयंकर प्रसंग अर्चनाच्या बाबतीत घडला ज्यामुळे ती या क्षेत्रापासून लांब गेली.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

आणखी वाचा : मुंबईत काम मिळत नसल्याने असरानी यांनी केलेली इंदिरा गांधींकडे तक्रार; म्हणाले, “बॉलिवूडमध्ये…”

ही घटना १९९७ मधील आहे. अर्चना एका उडिया चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होती. त्यावेळी एका चाहत्याने तिच्यावर बलात्कार करायचा प्रयत्न केला होता. जेव्हा अर्चनाला एका निर्जन ठिकाणी त्याने पाहिलं तेव्हाच त्याने तिच्यावर बळजबरी करायचा प्रयत्न केला. त्याच्या तावडीतून तिने कसंबसं स्वतःला सोडवलं पण या घटनेचा तिच्या मनावर चांगलाच परिणाम झाला.

मीडिया रीपोर्टनुसार त्या व्यक्तीला पोलिसांनी पकडलं अन् त्याला १८ महिन्यांची शिक्षादेखील झाली. या घटनेमुळे अर्चना प्रचंड खचली आणि तिने चित्रपटसृष्टीपासून फारकत घेतली. सध्या अर्चना जोगळेकर तिच्या परिवारासह अमेरिकेतील ‘न्यू जर्सी’ शहरात वास्तव्यास आहे. मनोरंजनसृष्टीला रामराम ठोकल्यानंतर तिने अमेरिकेतच डान्स क्लासेस सुरू केले असून तिथल्या लोकांना ती क्लासिकल नृत्याचे प्रशिक्षण देत आहे.

Story img Loader