scorecardresearch

Premium

‘त्या’ घटनेनंतर वडील धर्मेंद्र यांचा तिरस्कार करत होता बॉबी देओल; म्हणाला “अनेक वर्षे मी…”

एक काळ असा होता जेव्हा बॉबी देओल आणि धर्मेंद्र यांच नात तुटण्यावर आलं होतं.

boby deol and dharmendra
बॉबी देओल आणि धर्मेंद्र

अभिनेता बॉबी देओल नेहमीच चर्चेत असतो. बॉबीने आत्तापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र, अद्याप बॉबीने बॉलीवूडमध्ये म्हणावी तशी जागा निर्माण करु शकलेला नाही. बॉबीचे वडील धर्मेंद्र यांच्याबरोबर एक खास नातं आहे. या बाप-लेकामध्ये मैत्रीचे नातं आहे. पण एक काळ असा होता जेव्हा बॉबी आणि धर्मेंद्र यांच्या नात्यात दुरावा आला होता. बॉबी धर्मेंद्र यांचा तिरस्कार करु लागला होता. एवढचं नाही तर धर्मेंद्र यांच्या बोलण्याकडेही तो दुर्लक्ष करत होता. एका मुलाखतीत बॉबी देओलने याबाबतचा किस्सा सांगितला आहे.

हेही वाचा- सलमान खान आणि संगीता बिजलानीचे लग्न का मोडलं? एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली “तिने त्याला रंगेहाथ…”

Archana Gautam allegations on priyanka gandhi PA sandeep Singh
“माझ्या जातीमुळे…”, कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यावर अर्चना गौतमचे प्रियांका गांधींच्या निकटवर्तीयावर गंभीर आरोप; म्हणाली…
marathi actor Sharad Ponkshe
महात्मा गांधींच्या अस्थी विसर्जित केलेल्या नदीचा व्हिडीओ शरद पोंक्षेंनी केला शेअर; म्हणाले, “जगातली…”
Vishakha Subhedar lovestory
आई-वडिलांचा लग्नाला विरोध, तर आजी…; ‘अशी’ आहे विशाखा सुभेदार यांची फिल्मी लव्हस्टोरी, म्हणाल्या, “घरात कोंडून…”
kavita medhekar
‘असा’ असतो कविता मेढेकरांच्या घरचा गणेशोत्सव, म्हणाल्या, “सासूबाईंच्या निधनानंतर सासऱ्यांनी विचारलं की…”

बॉबी देओलने एका मुलाखतीत सांगितले होते की, “मी वयाच्या १८ व्या वर्षी पहिल्यांदा डिस्कोमध्ये गेलो होतो आणि तेव्हापासून माझ्यात बंडखोरी झाली होती. अनेक वर्षे मी माझ्या पालकांशी बोलणे टाळले. वडिलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचो. ते माझ्या भल्यासाठी गोष्टी समजावून सांगायचे. पण त्यावेळेस मी आंधळा झालो होतो आणि त्यांचे काहीही ऐकायचे नाही असे ठरवले होते. त्याकाळी माझ्या वडिलांबरोबरचे माझे नाते अत्यंत वाईट टप्प्यातून जात होते.”

मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीसोबत दुसरे लग्न केल्यानंतरही देओल कुटुंबाला कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला होता. हेमा मालिनी यांच्याबरोबर लग्न केल्यामुळेच धर्मेंद्र आणि बॉबी यांच्या नात्यात दुरावा आला असल्याची चर्चा रंगली होती . कुटुंबातील बदलत्या परिस्थितीचा बॉबीवर खूप परिणाम झाला होता. कालांतराने धर्मेंद्र आणि बॉबी देओल यांच्यातील नातं सुधारलं. आता देओल कुटुंबातील प्रत्येक जण कठिण काळात एकमेकांबरोबर असल्याच दिसून येतं.

हेही वाचा- धर्मेंद्र यांच्यानंतर आता हेमा मालिनीही चित्रपटांमध्ये करणार कमबॅक? ईशा देओलने केला खुलासा, म्हणाली…

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर बॉबी लवकरच रणबीर कपूरबरोबर ‘अॅनिमल’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहे. एवढंच नाही तर शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या अगामी प्रोजक्टमध्येही बॉबी देओल मुख्य भूमिका साकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या सीरिजमध्ये बॉबी एका वेगळ्याच अवतारात दिसणार आहे. बॉबीबरोबरच काही नवीन चेहऱ्यांनाही आर्यनने यात संधी दिल्याचं सांगितलं जात आहे. ही वेब सीरिज ६ एपिसोडची एक मिनी सीरिज असणार आहे. तसेच याच्याशी निगडीत काही डिटेल्स आर्यनने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केल्या आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: When bobby deol hated his father dharmendra used to ignore his words dpj

First published on: 15-09-2023 at 17:20 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×