बॉलीवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितचे (Madhuri Dixit) जगभरात चाहते आहेत. फक्त सामान्य लोकच नाही तर इंडस्ट्रीतील सेलिब्रिटीही माधुरीच्या अभिनयाचे, सौंदर्याचे चाहते आहेत. आता एका अभिनेत्याने माधुरी दीक्षितचं कौतुक केलं आहे. माधुरी खूप आवडायची, तिच्याशी लग्न करायला तयार होतो, असं त्याने म्हटलं आहे.
माधुरीशी लग्नाची इच्छा व्यक्त करणारा हा अभिनेता म्हणजे गोविंदा (Govinda) होय. ‘राजा बाबू’ फेम गोविंदाने त्याला माधुरीला किती आवडते याबाबत खूप वेळा सांगितलं आहे. तो म्हटला की तो माधुरीशी लग्न करायला तयार होता, पण पत्नी सुनीतामुळे तो लग्न करू शकला नाही. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत गोविंदा हे सगळं बोलला होता. त्याचा एक व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
गोविंदाने केले माधुरीच्या स्वभावाचे कौतुक
गोविंदाने माधुरीशी लग्न करण्याची इच्छा तर व्यक्त केली, त्याचबरोबर तिच्या कामाचे आणि स्वभावाचेही कौतुक केले. तो म्हणाला, “मी सुनीताला नेहमी म्हणतो तू मला होकार दिला नसतास तर मी माधुरीशी लग्न केलं असतं.” माधुरी ही आवडती अभिनेत्री आहे, तिचा स्वभाव खूप चांगला आहे, ती सर्वांशी खूप चांगली वागते. तिचे सर्वांशी चांगले सबंध आहेत. ती मैत्री निभावते, असंही गोविंदा माधुरीचं कौतुक करत म्हणाला.
माधुरीच्या कामाचे कौतुक करताना गोविंदा म्हणाला, “माधरी खूप चांगली आहे. मी सुनीताला म्हणायचो की तिचा स्वभाव खूप चांगला आहे. तिचे संस्कार चांगले आहेत आणि कोणताही दिखावा नाही. ती नाटक करतेय असंही वाटत नाही, मला तिच्याबद्दलच्या याच गोष्टी खूप आवडतात.”
गोविंदाला विचारण्यात आलं की त्याने कधी माधुरीसमोर हे म्हटलंय का? यावर तो म्हणाला, “मला एकदा संधी मिळाली तर मी स्टेजवरच हे बोललो होतो.” याचबरोबर गोविंदाने इतर अभिनेत्रींचेही कौतुक केले. ज्या अभिनेत्रींबरोबर त्याने काम केलं, त्या सर्वच अभिनेत्री खूप चांगल्या होत्या, असं तो म्हणाला. त्याने आपल्या चित्रपटांच्या यशाचे श्रेयही अभिनेत्रींना दिले.
माधुरी दीक्षित व गोविंदा यांनी ‘महासंग्राम’, ‘इज्जतदार’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. प्रेक्षकांना त्यांची जोडी खूप आवडली होती.