scorecardresearch

Premium

“मला त्याचा पश्चाताप…”; रणबीर कपूरच्या नावाच्या टॅटूबद्दल दीपिका पदुकोणने केलेलं वक्तव्य

दीपिकाने मानेवरील रणबीर कपूरच्या नावाचा टॅटू हटवण्याबाबात केलेलं वक्तव्य

deepika padukone tattoo
दीपिका पदुकोण टॅटू

अभिनेत्री दीपिका पदुकोण व अभिनेता रणबीर कपूर एकेकाळी रिलेशनशीपमध्ये होते. दोघांच्या प्रेमाच्या सगळीकडे चर्चा होत्या व ते लग्नही करतील, असं म्हटलं जात होतं. दीपिकाने तर रणवीरसाठी तिच्या मानेवर टॅटूही काढला होता. पण अचानक दोघांच्या ब्रेकअपची बातमी आली होती. त्यानंतर दीपिकाने रणवीर सिंगशी लग्नगाठ बांधली, तर रणबीर कपूरने आलिया भट्टशी लग्न केलं.

बदकासारख्या चालीमुळे होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल मलायका अरोराचं स्पष्ट उत्तर; नितंबांचा उल्लेख करत म्हणाली…

parineeti chopra and raghav chadha gave their wedding guests a customised handkerchief
परिणीती-राघवच्या लग्नसोहळ्यात पाहुण्यांना दिला होता खास रुमाल, सानिया मिर्झाने शेअर केलेला Inside फोटो पाहिलात का?
Censor Board reaction on actor Vishal allegations about corruption in CBFC
“एजंटच्या माध्यमातून…”, तामिळ अभिनेत्याच्या लाचखोरीच्या आरोपांवर सेन्सॉर बोर्डाचे उत्तर
theft
जावयाचा सासुरवाडीस हिसका, केले असे की…
tanushree dutta adil khan allegations on rakhi sawant
“तिच्यामुळे दोन मुलांनी आत्महत्या केल्या,” तनुश्री दत्ताचे राखी सावंतवर गंभीर आरोप; म्हणाली, “इतके धर्म बदलूनही…”

रणबीर व दीपिका आयुष्यात बरेच पुढे निघून गेले आहेत, पण तिच्या मानेवर तिने रणबीरसाठी काढलेल्या टॅटूची चर्चा आजही होत असते. तिने तिच्या मानेवर ‘RK’ लिहून घेतलं होतं. एकदा ‘कॉफी विथ करण’च्या तिसऱ्या पर्वात तिने हजेरी लावली होती. त्यावेळी तिला या टॅटूबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावेळी तिने खुलासा केला होता की तिला तिच्या निर्णयाचा पश्चाताप झाला नाही.

Video: “तुला लाज वाटत नाही का?” विचित्र ड्रेस घातलेल्या जान्हवी कपूरला नेटकऱ्यांनी सुनावलं, भारतीय संस्कृतीची करून दिली आठवण

ती म्हणाली होती, “हे असं काहीतरी आहे, जे मला त्यावेळी योग्य वाटलं होतं आणि मला कधीच पश्चाताप झाला नाही आणि मी तो टॅटू काढून टाकण्याचा कधीही विचार केला नाही. मला माहीत आहे की मीडिया सतत म्हणत आहे मी तो टॅटू काढला आहे. पण तो तसाच आहे आणि तो टॅटू हटवण्याचा माझा कोणताही प्लॅन नाही.”

दरम्यान, रणबीर कपूर सध्या ‘अॅनिमल’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत, तर दीपिका देखील तिच्या आगामी प्रोजेक्ट्सचे शूटिंग करत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: When deepika padukone said she never regretted rk tattoo on neck hrc

First published on: 27-04-2023 at 16:59 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×