Ahana Deol revealed what she would like to inherit from Dharmendra: धर्मेंद्र यांनी जेव्हा बॉलीवूडमध्ये पदार्पण केले, त्यावेळी त्यांचे आधीच प्रकाश कौर यांच्याशी लग्न झाले होते. सिनेसृष्टीत आल्यानंतर त्यांची भेट हेमा मालिनी यांच्याशी झाली. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी अनेकांना धक्का बसला होता.
१९८० ला धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुली आहेत. ईशा आणि अहाना देओल अशी त्यांची नावे आहेत. ईशा देओलने काही चित्रपटांत काम केले आहे. मात्र, अहाना देओल कायमच प्रसिद्धीझोतापासून दूर असते.
अहानाने ‘हर जिंदगी बझ’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने वडिलांबद्दल वक्तव्य केले होते. धर्मेंद्र यांच्या काही आठवणी सांगितल्या होत्या, ती नेमकं काय म्हणालेली हे जाणून घेऊ…
“मी सहा वर्षांची होते…”
अहाना लहापणीची एक आठवण सांगत म्हणालेली, “मी सहा वर्षांची होते. ते त्यांच्या शेतात लोणावळ्याला चालले होते. जाण्याआधी ते फक्त सांगण्यासाठी आले होते की मी जात आहे. मी अचानक म्हणाले की मलाही जायचे आहे. त्यानंतर त्यांनी माझी बॅग भरली आणि मला ते त्यांच्याबरोबर घेऊन गेले. कारमध्ये त्यांनी मला त्यांच्या मांडीवर बसवले. त्यांच्याबरोबरची ती माझी सर्वोत्तम आठवण आहे. सर्वात गोड आठवण आहे.”
आई-वडिलांना पडद्यावर पाहिल्यानंतर काय वाटायचे? याबद्दल अहाना म्हणालेली, “जेव्हा इतर कलाकारांबरोबरचे त्यांचे रोमँटिक सीन असायचे, तेव्हा मला ते आवडायचे नाही. मी तेव्हा संभ्रमात असायचे. मला रागही यायचा. माझी आई मला समजवायची. पण, सुरुवातीला माझे पालक इतर कलाकारांबरोबर रोमान्स करत आहेत, हे मला आवडायचे नाही.”
“माझ्या वडिलांनी मला नेहमीच…”
अहाना धर्मेंद्र यांच्याबद्दल असेही म्हणालेली, “माझ्या वडिलांनी मला नेहमीच प्रेमळ राहण्यास शिकवले आहे. प्रेम आणि आपुलकी त्यांच्यासाठी महत्वाची आहे. त्यांनी मला आनंदी, निरोगी आणि मजबूत राहण्यास शिकवले. हे सोपे वाटेल, पण त्याचा अर्थ खूप खोलवर आहे.
वडिलांकडून वारसाहक्काने काय मिळाले तर आनंद होईल? यावर अहाना म्हणालेली, “मला माझ्या वडिलांची पहिली कार, त्यांची फियाट मला वारशाने मिळाली तर मला खूप आनंद होईल. ती कार खूप छान आणि जुनी आहे. मला खात्री आहे की त्यांच्या असंख्य आठवणी तिच्याशी जोडल्या गेल्या आहेत. ती अशी गोष्ट आहे जी मला माझी असेल तर मलाआवडेल.”
ईशा देओलनेदेखील एकदा सांगितले होते की रणजीत यांच्याबरोबर धर्मेंद्र यांचा अॅक्शन सीन सुरू होता.ते धर्मेंद्र यांना मारत होते. ते पाहून ईशाला रडू कोसळले होते. तिला त्या अवस्थेत पाहून त्यांनी शूटिंग थांबवले आणि तिला हॉटेलवर परत पाठवले.
ईशाने हॉटरफ्लाय दिलेल्या मुलाखतीत असेही सांगितले होते तिने चित्रपटसृष्टीत काम करू नये, असे धर्मेंद्र यांना वाटत होते.१८ व्या वर्षी लग्न व्हावे, असे त्यांना वाटत होते. सुरुवातीला त्यांनी विरोध केला, पण आता गोष्ट वेगळी आहे, असे ईशा म्हणाली होती.
