scorecardresearch

“प्रसिद्ध निर्मात्याने हॉटेलमध्ये बोलावलं अन्…”; नीना गुप्तांनी सांगितलेला कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव

“माझा शो संपल्यानंतर मी त्या दिग्दर्शकाला भेटण्याची वेळ ठरवली. हॉटेलवर पोहोचल्यावर…”

“प्रसिद्ध निर्मात्याने हॉटेलमध्ये बोलावलं अन्…”; नीना गुप्तांनी सांगितलेला कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव
नीना गुप्ता (इंडियन एक्सप्रेस)

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता त्यांच्या चित्रपटांव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. विवियन रिचर्ड्सशी अफेअर असो किंवा दुसरे लग्न असो, नीना यांच्या आयुष्यातील अनेक पैलूंवर कायम चर्चा होताना दिसते. पण एक काळ असा होता जेव्हा नीना गुप्ता यांच्याकडे इतर सर्व कलाकारांप्रमाणे काम नव्हते आणि त्या चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवण्यासाठी प्रयत्न करत होत्या. त्या नीना गुप्ता कास्टिंग काउचचा बळी ठरण्यापासून थोडक्यात बचावल्या होत्या.

नीना गुप्ता यांनी ‘सच कहूं तो’ या त्यांच्या आत्मचरित्रात कास्टिंग काउचच्या अनुभवावर विस्तृतपणे लिहिलं आहे. नीना लिहितात की, त्या दिवसांत ‘खानदान’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले होते. “‘खानदान’मध्ये माझी भूमिका एका सशक्त मुलीची होती जिला मूल नको आहे, तर काम करायचं आहे. मला वाटलं की हा रोल माझ्या करिअरसाठी चांगला राहील, पण त्यानंतर मला सर्व नकारात्मक भूमिकांच्या ऑफर येऊ लागल्या. अशी भूमिका ज्याला काहीच अर्थ नव्हता, त्यामुळे मी खूप अस्वस्थ झाले होते.”

Photos: ३८ वर्षांनी मोठ्या सनी देओलबरोबर ‘या’ अभिनेत्रीने दिले होते बोल्ड सीन्स; कारण देत म्हणाली होती….

पुढे नीना गुप्ता लिहितात की, “मी पुन्हा फोटो काढले आणि पोर्टफोलिओ तयार केला. मी दिल्लीला परत जाण्याचा विचार केला पण मी पुन्हा थिएटरमध्ये काम करू लागले. पृथ्वी थिएटरमध्ये माझं नाटक चालू होतं. त्याचवेळी एका मित्राने सांगितले की दक्षिण भारतातील एक दिग्दर्शक आला आहे, तो त्याच्या चित्रपटासाठी मुलगी शोधत आहे. त्याने मला निर्मात्याचा फोन नंबर दिला. मी निर्मात्याला फोन केला आणि कळालं की तो पृथ्वी थिएटरच्या अगदी जवळ असलेल्या सन अँड सँड हॉटेलमध्ये थांबला होता.”

“माझ्या रंगामुळेच मला इंडस्ट्रीत…”, नवाजुद्दीन सिद्दीकीचं वक्तव्य; स्मिता पाटील, रिंकू राजगुरूचा उल्लेख करत म्हणाला….

नीना गुप्ता यांनी पुढे सांगितलं की, “माझा शो संपल्यानंतर मी त्या दिग्दर्शकाला भेटण्याची वेळ ठरवली. हॉटेलवर पोहोचल्यावर लॉबीतूनच मी त्याला फोन केला. तर दिग्दर्शक म्हणाला, मी तुझी वाट पाहतोय… हा माझा रूम नंबर आहे, तू वर ये. एकदा मला असं वाटलं की मी वरच्या मजल्यावर जाऊन त्याला खाली बोलावून यावं, पण ही नवीन मुलगी मला खाली बोलावत आहे असं त्याला वाटू नये, असा विचार माझ्या मनात आला.”

आधी इस्लामसाठी सोडली मनोरंजनसृष्टी, आता हिजाब परिधान करून केलं लग्न; प्रसिद्ध अभिनेत्रीचे फोटो व्हायरल

नीना गुप्तांच्या म्हणण्यानुसार, “मी वरच्या मजल्यावर जाऊन दरवाजा ठोठावला. खोलीत फक्त एक बेड आणि एक खुर्ची होती. डायरेक्टर खुर्चीवर बसले आणि मी बेडच्या एका कोपऱ्यावर बसले. संवाद सुरू झाला. मी त्याला माझ्या भूमिकेबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला की तुझी भूमिका नायिकेच्या मैत्रिणीची असेल. छोटी भूमिका होती म्हणून मी गप्प बसले. थोड्या वेळाने मी म्हणाले कि मला जायचे आहे. त्यावर तो संतापला आणि म्हणाला, ‘कुठे जायचंय तुला? तू इथे रात्र घालवणार नाहीस? त्याने असं बोलताच माझे पाय थरथरू लागले. माझ्या छातीचे ठोके वाढले आणि माझ्या पायाखालची जमिन सरकली. मला वाटलं की इथेच रात्र घालव, असं कोण कसं म्हणून शकतं. पण मग मी तिथून उठले, माझी बॅग घेतली आणि सर मला जायचंय, असं म्हणाले. त्याने माझ्याकडे खूप रागाने पाहिलं आणि म्हटलं जा, मला तुझं काहीच काम नाही आणि गरजही नाही.”

हा प्रसंग नीना गुप्ता यांनी त्यांच्या आत्मचरित्रात सांगितला होता. दरम्यान, सध्या त्या ‘वध’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्यापूर्वी त्यांचा ‘उंचाई’ चित्रपट हिट झाला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-12-2022 at 20:17 IST

संबंधित बातम्या