बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी हा कायमच चर्चेत असतो. उत्कृष्ट अभिनय आणि स्टंटबाजीच्या जोरावर त्याने सिनेसृष्टीमध्ये आपलं भक्कम स्थान निर्माण केले. बॉलिवूडचा अण्णा म्हणून त्याला ओळखले जाते. सुनील शेट्टीने अॅक्शन हीरो म्हणूनच बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली आणि पुढेही त्याची हीच ओळख कायम राहिली, पण सुनील शेट्टीच्या याच पदार्पणावर बऱ्याच लोकांनी टीकादेखील केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बार्बरशॉप विथ शंतनू’ या पॉडकास्टमध्ये सुनील शेट्टीने त्याच्या पहिल्या चित्रपटाबद्दल खुलासा केला आहे. प्रेक्षकांनी स्वीकारलं असूनसुद्धा काही समीक्षकांनी मात्र सुनील शेट्टीला हिणवलं होतं. या सगळ्या गोष्टींचा खुलासा सुनीलने या मुलाखतीमध्ये केला आहे.

आणखी वाचा : नाटकांची आवड, बँकेत नोकरी, मिस इंडियाशी लग्न; हरहुन्नरी परेश रावल यांच्याबद्दल ‘या’ गोष्टी ठाऊक आहेत का?

समीक्षकांच्या या टिकेबद्दल सुनील शेट्टी म्हणाला, “जेव्हा माझा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्याकाळच्या सर्वात नावाजलेल्या समीक्षकाने लिहिलं होतं की, ‘याने पुन्हा इडल्या विकल्या पाहिजेत’. अशा शब्दात त्यांनी माझ्या चित्रपटाचं समीक्षण केलं होतं. चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता, प्रेक्षकांनी मला अॅक्शन हीरो म्हणून स्वीकारलंही होतं, पण एक मोठं मीडिया हाऊस मला पुन्हा माघारी जायला सांगत होतं, हे योग्य नाही अशीच माझी भावना होती.”

वयाच्या ३१ व्या वर्षी सुनील शेट्टीने ‘बलवान’ या चित्रपटातून दिव्या भारतीसह पदार्पण केलं. पुढे याबद्दल तो म्हणाला, “मी कोणतंही प्रशिक्षण घेतलेलं नव्हतं, तरी एका शाळेच्या बालनाट्यातील एका झाडाच्या भूमिकेशी माझी तुलना त्या समीक्षकाने केली होती. त्यांना एवढं वाईट लिहायची काहीच गरज नव्हती. नंतर हे क्षेत्र फारच बेभरवशी असल्याचं मला समजलं तेव्हा मी इतर व्यवसाय सुरू केले जेणेकरून उद्या हे काम बंद झालं तर आपल्याकडे एक बॅकअप असला पाहिजे.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When famous critic of industry said harsh words about suniel shetty first film avn
First published on: 30-05-2023 at 10:07 IST