बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याचा आगामी टायगर ३ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात सलमानबरोबर अभिनेत्री कतरिना कैफ झळकणार आहे. सलमान खान आणि कतरिना यांच्यातील बॉन्डिंगबद्दल सतत चर्चा रंगताना दिसतात. कतरिना कैफच्या सिनेसृष्टीतील यशामागे सलमान खानचा मोठा वाटा आहे. कतरिनाने सलमान खानबरोबर अनेक मोठ्या चित्रपटात काम केले आहे. नुकतंच त्यांच्या मैत्रीचा एक किस्सा समोर आला आहे.

सलमान खान आणि कतरिना कैफ या दोघांनी आतापर्यंत अनेक चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. त्या दोघांनी ‘पार्टनर’, ‘मैने प्यार क्यूं किया’, ‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. या दोघांच्या जोडीला मोठ्या पडद्यावर भरपूर प्रेम मिळाले आहे. त्या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चाही रंगल्या होत्या. पण कतरिनाने या चर्चांना पूर्णविराम देत अभिनेता विकी कौशलबरोबर लग्न केले आहे.
आणखी वाचा : सलमान खानच्या ‘त्या’ कृत्यामुळे कतरिनाने दाबला होता त्याचा गळा, व्हिडीओ व्हायरल

कतरिना ही कायमच सलमानला गुरु मानते. त्या दोघांची मैत्री अजूनही कायम आहे. कतरिनाच्या करिअरचा सुरुवातीचा काळ अत्यंत खडतर होता. ती अभिनय विश्वात तिचे नशीब आजमावत होती. कतरिनाला महेश भट्ट यांच्या ‘साया’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. या चित्रपटात कतरिनाबरोबर अभिनेता जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत झळकणार होता. कतरिनाने या चित्रपटाचे शूटींगही केले होते. पण नंतर तिला या चित्रपटातून वगळण्यात आले. तिला ही गोष्ट समजताच तिने रडत रडत सलमान खानला फोन केला होता.

त्यावेळी कतरिनाने सलमानला तिला या चित्रपटातून काढून टाकण्यात आल्याचे सांगितले होते. त्यावर कतरिनाला असं रडताना पाहून सलमान हसायला लागला होता. त्यावेळी त्याने कतरिनाला शांत करत सिनेसृष्टीचे वास्तव सांगितले होते.

आणखी वाचा : “तुम्ही कोणाच्या मर्जीतले…” मराठी अभिनेत्याने देवेंद्र फडणवीसांना टॅग करत केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

“बॉलिवूडमध्ये असे प्रकार कायम होत असतात. पण मला माहिती आहे की तू फार पुढे जाशील. अभिनय क्षेत्रात हे सतत होत असतं. त्यामुळे या गोष्टी मनाला जास्त लावून घेऊन नकोस”, असा सल्ला सलमानने कतरिनाला दिला होता.

दरम्यान सलमान खान आणि कतरिना कैफ लवकरच ‘टायगर ३’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘टायगर ३’ मध्ये सलमान पुन्हा एकदा रॉ एजंटची भूमिका साकारताना दिसेल. तर कतरिना यात आयएसआय एजंट झोयाची भूमिका साकारणार आहे. यात आभिनेता इमरान हाशमी खलनायकेच्या भूमिकेत दिसेल. याआधी सलमान आणि कतरिनाने अली अब्बास जाफरच्या ‘भारत’या चित्रपटात एकत्र काम केलं होतं.