scorecardresearch

इरफान खानच्या गर्लफ्रेंडला डेट करत होता नवाजुद्दीन सिद्दीकी, अभिनेत्याला समजलं अन्…

नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

nawazuddin siddiqui dated irfan khan gf
नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवाजुद्दीन व त्याच्या कुटुंबियांवर पत्नी आलियाने गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकीचे अनेकांशी वाद झाले आहेत. दिवंगत अभिनेता इरफान खान व नवाजुद्दीन यांच्यामध्ये एका महिलेमुळे वादाची ठिणगी पडली होती.

नवाजुद्दीनचा भाऊ शमासने नुकतीच ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने अनेक खुलासे केले आहेत. शमासने इरफान खान व नवाजुद्दीन सिद्दीकीमधील वादाबाबतही या मुलाखीदरम्यान भाष्य केलं. इरफान खानची गर्लफ्रेंड नवाजुद्दीनला आवडत होती. त्यामुळे नवाजुद्दीनही तिला डेट करत होता. याची बरीच चर्चाही रंगली होती. यामुळे इरफान व नवाजुद्दीनमध्ये वादही झाला होता. परंतु, इरफानने यावर कधीच भाष्य केलं नाही. अनेक मुलाखतीत इरफानला याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. परंतु, त्याने वेळोवेळी या प्रकरणाबाबत भाष्य करणं टाळलं होतं.

हेही वाचा>> “अश्लील व्हिडीओ असलेले आदिलचे फोन पोलिसांनी…” राखी सावंतचे गंभीर आरोप

आता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या भावाने याबाबत खुलासा केला आहे. शमास म्हणाला, “इरफान खानच्या गर्लफ्रेंडला नवाजुद्दीन डेट करत होता. यामुळेच इरफान व नवाजुद्दीनमध्ये वादही झाला होता. लंच बॉक्स चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानही त्यांच्यामध्ये याच गोष्टीवरुन पुन्हा वाद झाला होता. त्यामुळे शूटिंगचा संपूर्ण दिवस वाया गेला होता. लंच बॉक्समध्ये इरफान व नवाज दोघांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. पण नवाज व इरफानने एकमेकांच्या अनुपस्थितीतच सेटवर येऊन शूटिंग करू असं सांगितलं होतं”.

हेही वाचा>> Video: “१० वाजता कोणता योगा असतो”, ‘त्या’ व्हिडीओमुळे प्राजक्ता माळी ट्रोल, नेटकरी म्हणाले “विना मेकअपची दारू…”

नवाजुद्दीन सिद्दीकी व आलियाने २०१० साली लग्न केलं होतं. त्यांना दोन मुलं आहेत. परंतु, आता त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. नवाजुद्दीनची पत्नी आलियाने अभिनेत्यावर छळ केल्याचा आरोप केला आहे. याशिवाय नवाजुद्दीनवर बलात्काराचा आरोप करत आलियाने पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-03-2023 at 10:06 IST