Premium

“त्याने मला…”, गरोदर असल्याचं कळताच जेव्हा नीना गुप्तांनी विवियन रिचर्ड्सना केला होता फोन

नीना गुप्ता गरोदर असल्याचं कळाल्यावर काय होती विवियन रिचर्ड्स यांची प्रतिक्रिया? जाणून घ्या

Neena Gupta First Phone Call to Vivian Richards
नीना गुप्ता, विवियन रिचर्ड्स

आपल्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिलेल्या अभिनेत्री म्हणजे नीना गुप्ता होय. नीना गुप्ता यांचं अफेअर आणि लग्न न करताच आई होणं, या गोष्टींबद्दल खूप बोललं जातं. नीना गुप्ता यांचा ४ जून रोजी वाढदिवस असतो, त्यानिमित्ताने त्यांचं क्रिकेटपटू विवियन रिचर्डशी अफेअर व गरोदर असल्यावर त्यांनी जेव्हा विवियन यांना फोन केला, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती, याबद्दल जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Video: अमिताभ बच्चन यांची नात ‘गली बॉय’ फेम अभिनेत्याला करतेय डेट? दोघांचा व्हिडीओ व्हायरल

नीना आणि विवियन जयपूरमध्ये एका चित्रपटाचं शुटिंग सुरू असताना भेटले होते. जयपूरच्या राणीने चित्रपटाच्या कलाकारांना आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघाला जेवायला बोलावलं होतं, तेव्हा त्यांची विवियनशी भेट झाली, ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि एकत्र वेळ घालवला. विवियन रिचर्ड्स आधीच विवाहित होते. ते भारतातील क्रिकेटचा दौरा संपल्यावर मायदेशी परतले. त्यानंतर नीना यांना त्या गरोदर असल्याचं कळलं, याबद्दल माहिती देण्यासाठी त्यांनी विवियन यांना फोन केला होता.

हेही वाचा – दुसऱ्या लग्नाचा निर्णय सांगितल्यावर पहिली पत्नी व २२ वर्षांच्या मुलाची ‘अशी’ होती प्रतिक्रिया, आशिष विद्यार्थींचा खुलासा

‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत नीना यांनी विवियनशी झालेल्या संभाषणाची आठवण सांगितली होती. त्या म्हणाल्या, “गरोदर असल्याचं कळल्यावर मला खूप आनंद झाला होता, असं नाही. मी आनंदी होते, कारण मी त्याच्यावर प्रेम केलं. मी त्याला फोन केला आणि विचारलं की ‘तुला हे मूल नको असेल तर मलाही नकोय’. तो म्हणाला, ‘मला हे मूल तुझ्यासाठी हवंय’. सर्वांनी मला सांगितलं, ‘नाही, बाळाला जन्म देऊ नकोस, तू एकटी सगळं कसं करू शकणार?’ कारण तो आधीच विवाहित होता आणि मी त्याच्याशी लग्न करू शकत नव्हते आणि तिथे राहण्यासाठी अँटिग्वाला जाऊ शकत नव्हते. पण जेव्हा तुम्ही तरुण असता ना तेव्हा तुम्ही आंधळे असता. जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा तुम्ही कोणाचंही ऐकत नाही. कोणतीही मुलं त्यांच्या पालकांचं ऐकत नाहीत आणि मीही तशीच होते.”

विवाहित असलेल्या विवियन यांनी नीना यांना बाळाला जन्म देण्यास सांगितलं. नीना यांच्या कुटुंबाने मात्र सुरुवातीला त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला नाही, प्रंचड विरोध केला. परंतु शेवटी त्यांच्या वडिलांनी पाठिंबा दिला आणि मग कुटुंबातील इतर लोकांचा विरोध कमी झाला. नीना यांनी एकल माता बनण्याचा निर्णय घेतला आणि मुलीला जन्म दिला. त्यांच्या मुलीचं नाव मसाबा गुप्ता असून ती आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री आहे. नीना यांनी २००८ मध्ये लग्न केलं होतं, त्यांच्या पतीचं नाव विवेक मेहरा आहे. वयाची पन्नाशी उलटल्यानंतर लग्न केल्यामुळे नीना फार चर्चेत राहिल्या होत्या.

नीना यांनी मुलीला लहानपणीच तिच्या वडिलांबद्दल सांगितलं होतं. “आम्ही (मी आणि विवियन) कधी कधी संपर्कात होतो, कधी नाही. पण मी मसाबाला सगळं मोकळेपणानं सांगितलं. मुलांना खरं सांगणं महत्वाचं आहे, त्यांना इतर कुणीही सांगू शकतं, त्याऐवजी आपण सांगितलेलं चांगलं,” असं नीना म्हणाल्या होत्या. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी नीना यांची लेक मसाबा गुप्ताने दुसरं लग्न केलं. तेव्हा तिच्या लग्नाला विवियन रिचर्ड्स उपस्थित राहिले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: When neena gupta made first phone call to vivian richards to tell about pregnancy hrc