शाहरुख, सलमान, आमिर हे खान कितीही लोकप्रिय असले तरी या हिंदी चित्रपटसृष्टीचा पहिला खरा खुरा सुपरस्टार म्हंटलं की एकच नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे राजेश खन्ना. रोमॅंटिक अंदाज आणि अभिनयाची वेगळीच शैली यामुळे राजेश खन्ना हे आजही प्रेक्षकांना तितकेच आवडतात. आज त्यांची जयंती. एका पाठोपाठ एक सुपरहीट चित्रपट देणाऱ्या या सुपरस्टारला आपल्या स्टारडमबाबत मात्र कायम चिंता असायची.

चित्रपटसृष्टीत एक वेगळंच स्टारडम अनुभवलेल्या राजेश खन्ना यांचा अंदाजही हटके होता. अर्थात माणूस हा कायम यशाच्या शिखरावर बसू शकत नाही, परिस्थिती आणि सभोवतालची स्पर्धा त्याला खाली आणतेच. जेव्हा राजेश खन्ना यांच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली तेव्हा अमिताभ बच्चन हे नाव लोकप्रिय होऊ लागलं. रोमॅंटिक हीरो ऐवजी लोक बच्चन यांच्या ‘angry young man’ ला पाहणं पसंत करू लागले. यादरम्यान बच्चन यांनी एकाहून एक सरस आणि वैविध्य असलेल्या भूमिका साकारल्या. याचदरम्यान राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्यातील शीतयुद्ध समोर येऊ लागलं.

uddhav thackeray slams narendra modi during in an interview with the indian express
मोफत धान्य देण्यापेक्षा रोजगार का देत नाही? ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल
Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”
deputy leader of Shiv Sena Thackeray group Sushma Andhare criticized BJP
‘‘…हा तर भाजपाचा डीएनए, आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही” सुषमा अंधारे यांची टीका, म्हणाल्या…
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा

आणखी वाचा : कपूर परिवार मारतो ‘या’ पदार्थावर मनसोक्त ताव; करीनाने केला कुटुंबियांच्या आवडत्या डिशबद्दल खुलासा

१९८१ मध्ये अमिताभ बच्चन यांचा ‘लावारीस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट चांगलाच सुपरहीट ठरला. यातील गाणीसुद्धा जबरदस्त हीट ठरली. यातील ‘मेरे अंगने मे’ हे गाणं चांगलंच गाजलं. या गाण्यात बच्चन साडी नेसून नाचताना दिसतात. याबद्दलच तेव्हा राजेश खन्ना यांनी भाष्य केलं होतं. राजेश खन्ना यांचं चरित्र लिहिणारे वारिष्ट पत्रकार आणि लेखक यासिर उस्मान यांनी त्यांच्या ‘कुछ तो लोग कहेंगे’ या पुस्तकात याबद्दल खुलासा केला आहे.

अमिताभ यांच्या त्या गाण्याबद्दल टिप्पणी करताना एकदा राजेश खन्ना म्हणाले होते की, “माझी प्रतिष्ठा, मानमरातब याचा विचार करता मला कुणी जगातील सगळी संपत्ती जरी दिली तरी मी साडी नसून ‘मेरे अंगने में’ यावर नाचणार नाही.” इतकंच नाही तर चित्रपटाच्या सेटवरही राजेश खन्ना उशिरा पोहोचायचे, याबद्दल एका पत्रकाराने त्यांना जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले, “घड्याळाच्या काट्यावर क्लर्क काम करतात, कलाकार नाही.” हा अंदाज होता पहिल्या सुपरस्टारचा आणि शेवटपर्यंत राजेश खन्ना हे असेच होते.