Rekha - Jaya Bachchan Video: एकेकाळी अमिताभ बच्चन व रेखा यांचे अफेअर होते. रेखा (Rekha) यांनी अमिताभ (Amitabh Bachchan) यांच्यावर असलेल्या प्रेमाची कबुली दिली होती, मात्र बिग बींनी कधीच त्याबाबत प्रतिक्रिया दिली नाही. कालांतराने दोघेही वेगळे झाले आणि अमिताभ व जया यांचे लग्न झाले. त्यानंतर कधीच अमिताभ व रेखा एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसले नाहीत. पण जया व रेखा यांची एकदा पुरस्कार सोहळ्यात गळाभेट झाली होती आणि त्या भेटीचं निमित्त खुद्द अमिताभ बच्चन होते. रेखा व जया बच्चन यांना एकाच फ्रेममध्ये पाहणं दुर्मिळ गोष्ट आहे. पण एकदा अमिताभ बच्चन यांना अवॉर्ड मिळाल्यानंतर रेखा यांनी धावत जाऊन जया बच्चन (Rekha hugged Jaya Bachchan) यांना मिठी मारली होती. २०१६ मध्ये स्टार स्क्रीन अवॉर्ड्समध्ये अमिताभ बच्चन यांना पिकूसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. बिग बींच्या नावाची घोषणा होताच जया आणि अमिताभ दोघेही त्यांच्या जागेवरून उठले. अमिताभ पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचाकडे जात असताना काही अंतरावर बसलेल्या रेखा जयाकडे धावल्या आणि त्यांना प्रेमाने मिठी मारली. त्यानंतर दोघींनी एकत्र उभे राहून अमिताभ यांना हा पुरस्कार स्वीकारताना पाहिलं. अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम आहे का? मुलाखतीत थेट विचारलेल्या प्रश्नावर रेखा म्हणाल्या होत्या… चित्रपट निर्माते सुभाष घई यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारासाठी रणवीर सिंह व अमिताभ बच्चन यांच्या नावाची घोषणा केली होती. यावेळी पुरस्कार स्वीकारताना दोघांनी स्टेजवर एकमेकांना मिठी मारली होती. या पुरस्कार सोहळ्यात रेखा यांनी जया बच्चन यांना मिठी मारल्याचा व्हिडीओही खूप व्हायरल झाला होता. “माझं कुटुंब उद्ध्वस्त झालंय”, अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न झाल्यावर जया यांच्या वडिलांनी व्याहींजवळ व्यक्त केलेल्या भावना रेखा व अमिताभ बच्चन यांनी 'मुकद्दर का सिकंदर', 'मिस्टर नटवरलाल' आणि 'गंगा की सौगंध'सह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली होती. रेखा, जया व अमिताभ हे तिघेही यश चोप्रांच्या 'सिलसिला' (१९८१) चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते. यात अमिताभ व रेखा अखेरचे एकत्र काम करताना दिसले. या चित्रपटात या तिन्ही स्टार्सच्या खऱ्या आयुष्यातील प्रेमाचा त्रिकोण दाखवण्यात आला होता अशी चर्चाही झाली होती. रेखा, अमिताभ बच्चन व जया बच्चन यांचा फोटो अमिताभ, जया व रेखा लाँग ड्राइव्हवर जायचे एकत्र; ‘ते’ दोघेही पुढच्या सीटवर बसायचे अन् मागे… रेखा व ऐश्वर्या राय यांच्या भेटीची चर्चा नुकतंच अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचं लग्न झालं. या लग्नात अमिताभ बच्चन पत्नी जया, मुलं व नातवडांबरोबर आल्या होत्या. तर, ऐश्वर्या लेक आराध्याबरोबर पोहोचली होती. याठिकाणी रेखा यांनी बिग बींच्या सूनेची व नातीची भेट घेतली होती. त्यांनी आराध्याला प्रेमाने गालावर किस करत तिला आशीर्वाद दिले होते. या तिघींचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता.