Salman Khan Joked About Salim Khan Marrying Twice: बॉलीवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक म्हणून सलमान खानचे नाव घेतले जाते. सलमान खान हा त्याच्या एकापेक्षा एक भूमिकांसाठी ओळखला जातो. अनेकदा सलमान खानच्या लग्नाच्यादेखील चर्चा होताना दिसतात.
लग्नाबाबत सलमान खान काय म्हणालेला?
सलमान खान यावर्षी ६० वर्षांचा होईल. अद्याप तो अविवाहित आहे. तो कधी लग्न करणार, याची चाहत्यांना कायमच उत्सुकता असते. अनेक अभिनेत्री, गायिका यांच्याबरोबरही त्याचे नाव जोडले जाते. सलमानने मात्र तो सिंगल असल्याचे अनेकदा सांगितले आहे. विविध मुलाखती, मीडियाशी संवाद साधताना त्याला त्याच्या लग्नाबाबत प्रश्न विचारला जातो. त्यावर सलमान खान अनेकदा गंभीरतापूर्वक तर कधी विनोदी पद्धतीने यावर उत्तरे देतो.
लेहेरेनला दिलेल्या एका मुलाखतीत सलमान लग्नाबाबत म्हणालेला, “मला वाटतं की लग्न ही विनोदी गोष्ट आहे. १९९९ साली प्रदर्शित झालेल्या बीवी नंबर १ तसेच २००४ साली प्रदर्शित झालेल्या मुझसे शादी करोगी हे चित्रपट त्यावरच आधारित आहेत. जोडप्यांमध्ये जी भांडणे होतात, त्यातूनदेखील विनोदनिर्मिती होऊ शकते. सासू-सुनांमध्ये होणारी भांडणे आहेत, एकता कपूर त्यातूनच पैसे मिळवत आहे.”
लग्न ही सर्वोत्तम गोष्ट आहे, असे अनेक जण सांगत असतात. पण, मी अनेकांना त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी नसल्याचे पाहिले आहे. पुढे त्याने त्याच्या वडिलांवरदेखील विनोद केला. तो म्हणालेला, “माझे वडील खूप आनंदी आहेत, कारण त्यांना दोन पत्नी आहेत आणि त्या दोघीसुद्धा आनंदी आहेत. सलमा खान व हेलन यांच्यात उत्तम नाते आहे.”
सलीम खान यांनी १९६४ मध्ये सलमा खान यांच्याबरोबर लग्न केले होते, तर त्यांनी १९८१ मध्ये अभिनेत्री हेलन रिचर्डसन यांच्याशी लग्न केले. सलीम खान यांच्या दुसरे लग्न कऱण्याबाबत याआधी अरबाज खाननेदेखील वक्तव्य केले होते. हेलन यांच्याबरोबर सर्वांचे नाते चांगले असल्याचे त्याने म्हटले होते.
दरम्यान, सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचे तर काही दिवसांपूर्वीच त्याचा सिंकदर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदानादेखील प्रमुख भूमिकेत दिसली होती. मात्र, सलमानच्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला. याआधी सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या टायगर ३ लादेखील अपयश आले होते. आता आगामी काळात तो कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.